Mathura Boy Kills Father: युट्यूबवर क्राईम पेट्रोलचे व्हिडिओ पाहून एका अल्पवयीन मुलाने केली वडिलांची हत्या; उत्तर प्रदेशातील मथुरा येथील घटना
Crime | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: File Image)

17-Year-Old UP Boy Kills Father: युट्यूबवर (Youtube) गुन्ह्यांसंबंधीचे व्हिडिओ पाहून एका अल्पवयीन मुलाने आपल्या वडिलांची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. ही घटना उत्तर प्रेदशच्या (Uttar Pradesh) मथुरातील (Mathura) आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलाला अटक केली असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. वडील सतत आपल्या बहिणीला श्रुल्लक कारणांवरून मारहाण करायचे. याच रागातून मुलाने आपल्या वडिलांची हत्या केल्याचे समजत आहे. महत्वाचे म्हणजे, ही हत्या लॉकडाऊनच्या काळात झाली असून आरोपीला आता अटक करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा इयत्ता आकरावीमध्ये शिकत असून त्याला गुन्ह्यांसंबंधीचे व्हिडिओ पाहण्याची सवय होती. दरम्यान, त्याचे वडिल सतत बहिणीला मारहाण करायचे. याच रागातून त्याने आपल्या वडिलांच्या डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला केला. त्यानंतर त्याने वडिलांचा गळा दाबून खून केला. वडिलांच्या चेहऱ्यावर आणि मानेवर हाताच्या बोटांचे ठसे उमटवू नये, यासाठी त्याने त्यावेळी वडिलांचा चेहरादेखील झाकला होता. विशेष म्हणजे, गुन्ह्यांसंबंधीचे तब्बल 100 व्हिडिओ पाहून त्याने खूनाचे महत्वाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तसेच व्हिडिओ पाहूनच त्याने वडिलांच्या मृतदेहाची विल्हेवाटही लावली, अशी माहिती समोर आली आहे. मे महिन्यांत लॉकडाउनच्या काळात ही घटना घटला जी आत्ता उघडकीस आली आहे. याबाबत इंडिया टूडेने वृत्त दिले आहे. हे देखील वाचा- Mumbai Local Accident: घाटकोपर स्थानकात धावत्या लोकल मध्ये चढण्याच्या प्रयत्नात महिला प्लॅटफॉर्मवर पडली; RPF कर्मचार्‍याच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला (Watch Video)

अकरावीत शिकणाऱ्या या अल्पवयीन मुलाने गुन्ह्यांसंबंधीचे जवळपास 100 व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहिले त्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीने त्याने वडिलांचा खून केला. या मुलाचा फोन तपासल्यानंतर त्यामध्ये गुन्ह्यांसंबंधीचे व्हिडिओ पाहिल्याचे आढळून आले, अशी माहिती मथुराचे पोलीस अधीक्षक उदय मिश्रा यांनी दिली आहे.

सध्या गुन्हेगारींच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. यामुळे नागरिकांना सावधान करण्यासाठी टीव्ही सिरिअलमध्ये गुन्ह्यांसंबंधीचे व्हिडिओ दाखवले जातात. याशिवाय, संबंधित घटना अनेकांसोबत घडू नये. याचबरोबर एखाद्या व्यक्तीने नैराश्यातून किंवा वादातून चुकीचा मार्ग निवडू नये, या उद्देशातून हे व्हिडिओ दाखवले जातात.