Mumbai Local Accident: घाटकोपर स्थानकात धावत्या लोकल मध्ये चढण्याच्या प्रयत्नात महिला प्लॅटफॉर्मवर पडली; RPF कर्मचार्‍याच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला (Watch Video)
Mumbai Local Train | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

मुंबई मध्ये कोरोना वायरस संकटासोबत जगायला शिकणारे मुंबईकर पुन्हा हळूहळू कामावर रूजू होत आहे. मुंबई लाईफलाईन अशी ओळख असणारी मुंबई लोकल (Mumbai Local) देखील आता पुन्हा सार्‍यांसाठी सज्ज होत आहे. सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि महिलांना रेल्वे प्रवासाची मुभा आहे. मुंबई घाटकोपर स्थानकामध्ये (Ghatkopar Station) प्लॅटाफॉर्म क्रमांक 2 जवळ चालत्या मुंबई लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न करणारी एक महिला खाली पडली. लोकलच्या वेगासोबत ती देखील गाडीखाली येण्याची शक्यता होती मात्र प्लॅटफॉर्मवरील एका सजग RPF कर्मचार्‍याने तिला खेचून वाचवले. दरम्यान ही घटना स्टेशनवर असणार्‍या सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाली आहे. मध्य रेल्वेने ही घटना शेअर करत प्रवाशांना सुरक्षित प्रवास करण्याचं आवाहन केले आहे. ही घटना 28 ऑक्टोबरची आहे. मुंबईच्या CSMT स्थानकात आता एअरपोर्ट्सच्या धर्तीवर मध्य रेल्वेचं नवं प्रशस्त Namah LOUNGE! कॅफे सर्व्हिस ते ट्रॅव्हल कीट मिळतात 'या' सेवा!

मुंबईकरांनी प्रवास करताना काळजी घेणं आवश्यक आहे. धावत्या गाडीत किंवा चुकीच्या दिशेने चढणं, उतरणं प्रवाशांच्या जीवावर बेतू शकतं. मुंबई मधील आजचा प्रकार देखील त्यामधीलच एक उदाहरण आहे. महिला प्रवासीचा तोल जाऊन ती मागे डोक्यावर पडली. सुदैवाने पोलिसांनी कार्यतत्परता दाखवत तिला बचावलं आणि पुढील अनर्थ टळला.

घाटकोपर स्थानकामधील घटना 

महाराष्ट्र मिशन बिगिन अगेन अंतर्गत आता 30 नोव्हेंबरपर्यंत देशात आणि राज्यातही मागील महिन्यांच्याच नियमावली पुढे रेटण्यात आल्या आहेत. सध्या सर्वसामान्य महिलांना सकाळी 11 ते 4 आणि संध्याकाळी 7 ते शेवटची लोकल असा प्रवास करण्याची मुभा आहे. सार्‍या मुंबईकरांना लोकल सुरू करताना गर्दीचं नियंत्रण करण्यासाठी विविध पर्यायांवर सध्या विचार सुरू आहे.