Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

Mandsaur Bus Accident: मध्य प्रदेश (Madya Pradesh) येथील इंदूरहून भिलवाडा येथे जाणारी प्रवासी बसचा अपघात झाल्याचे घटना घडली आहे.बस रस्त्याच्या मध्योमध उलटल्याने 21 प्रवासी जखमी झाले आहेत. महू-नीमच चौपदरी राज्य महामार्गावर मंदसौर जिल्ह्यातील मल्हारगढ तहसीलजवळ मंगळवारी सकाळी अपघात झाला. यात कोणीही गंभीर जखमी झाले नसल्याचे वृत्त आहे. चालकाचे वाहनावरिल नियत्रंण सुटल्याने हा बसचा अपघात झाला आणि बस उलटली. सकाळी 6 वाजताच्या सुमारास रस्त्याच्या मधोमध खासगी प्रवाशी बस उलटली.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इंदूरहून भिलवाडा येथे जाणाऱ्या एका खासगी प्रवासी बस चालकाचे अचानक नियंत्रण सुटले. ही बस रस्त्यावर वेगवान धावत होती. दरम्यान चालकाचे  दुर्लक्ष झाल्याने नियंत्रण सुटलं.  या अपघातात बस मधील २१ प्रवाशी जखमी  झाले आहे. या अपघाता नंतर रस्त्यावर बऱ्याच वेळ वाहतुक कोंडी झाली होती. पोलीसांनी या घटनाची नोंद घेतली आहे.

बसमधील बहुतांश प्रवासी झोपलेले होते. प्रवासी बसमध्ये सुमारे 36 प्रवासी होते, त्यातील 21 अपघातात जखमी झाले. या सर्वांना रुग्णवाहिकेच्या मदतीने मल्हारगड आरोग्य केंद्रात नेण्यात आले.बहुतांश रुग्णांना प्राथमिक उपचार करून घरी पाठवण्यात आले. त्याचबरोबर सुमारे चार जणांचे हात-पाय फ्रॅक्चर झाले आहेत. मात्र, त्यापैकी कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. याप्रकरणी मल्हारगड पोलिसांनी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सरकार उपकार असं बस चालकाचे नाव आहे. तो गाडी वेगवान चालवत असल्याने हा अपघात झाला आहे अशी माहिती मिळाली.