Pakistani ISI Agent Arrested: UP ATS ची मोठी कारवाई; पाकिस्तानला गुप्तचर माहिती पाठवल्याप्रकरणी भारतीय दूतावासात तैनात सत्येंद्र सिवालला अटक
Pakistani ISI Agent Arrested (PC - X/@shorts_91)

Pakistani ISI Agent Arrested: उत्तर प्रदेशच्या एटीएसच्या पथकाला (UP ATS Team) मोठे यश मिळाले आहे. यूपी एटीएसने रशियात राहणाऱ्या आणि आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या एका भारतीय एजंटला मेरठमधून अटक केली आहे. या प्रकरणाबाबत यूपी एटीएसकडून मिळालेल्या माहितीनुसार, परराष्ट्र मंत्रालयात एमटीएस (मल्टी-टास्किंग, स्टाफ) या पदावर कार्यरत सत्येंद्र सिवाल (Satyendra Siwal) ला यूपी एटीएसने अटक केली आहे. भारतीय असूनही, त्याच्यावर सतत पाकिस्तानी एजन्सी इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स (ISI) साठी काम केल्याचा आरोप आहे. सत्येंद्र हा मूळचा हापूर जिल्ह्यातील रहिवासी असून तो मॉस्को येथील भारतीय दूतावासात तैनात होता.

एटीएसकडून मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश एटीएसला गोपनीय विभागाकडून माहिती मिळाली होती की, पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या हँडलर्सकडून काही लोकांना हनी ट्रॅप केले जात आहे. भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांना आमिष दाखवून भारताच्या धोरणात्मक आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण गोपनीय आणि प्रतिबंधित माहिती मिळवली जात आहे. ज्यामुळे भारताच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तेव्हापासून यूपी एटीएस पथक यावर लक्ष ठेवून होते. तसेच यासंदर्भात पुरावे गोळा करत होते. (हेही वाचा - DRDO Scientist Arrested: हनीट्रॅपमध्ये अडकला पुण्यातील डीआरडीओ शास्त्रज्ञ; पाकिस्तानला पुरवली गुप्त माहिती, ATS कडून अटक)

दरम्यान, एटीएसच्या तपासात समोर आले की, सत्येंद्र सिवाल हा भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयात एमटीएस म्हणून नियुक्त असून तो सध्या भारतीय दूतावासात कार्यरत आहे. सत्येंद्र हा आयएसआयचा एजंट असून तो गोपनीय माहिती पाकिस्तानला पाठवत होता. या बदल्यात पाकिस्तानातून त्याला पैसेही पाठवण्यात आले. सतेंद्र 2021 पासून मॉस्को येथील भारतीय दूतावासात तैनात असल्याची माहिती मिळाली आहे. (हेही वाचा: सायबर गुन्हेगार टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश; 12 वी पास मास्टरमाईंडने दिवसाला केली 5 कोटींहून अधिक कमाई)

चौकशीत दिली गुन्ह्याची कबुली -

मीडिया सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटकेदरम्यान सतेंद्र सिवाल यांच्याकडून दोन मोबाईल फोन, आधार कार्ड आणि पॅन कार्ड जप्त करण्यात आले आहे. सत्येंद्रने चौकशीदरम्यान गुन्ह्याची कबुली दिली. यूपी एटीएसकडून मिळालेल्या माहितीनुसार, सतेंद्र सिवालची चौकशी सुरू आहे. कडक चौकशी केल्यानंतर सतेंद्रने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सर्व गोपनीय माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेला पाठवल्याचे सांगितले आहे.