संपूर्ण देशात महाराष्ट्राच्या राजकारणाची चर्चो रंगली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाली, असा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाल (Randeep Surjewala) यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत भाजपवर तोफ डागली. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांना तुरुंगात टाकण्याची भाषा केली होती. मात्र, आता त्यांनी अजित पवार यांना मंत्रालयात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. 'मोदी है तो मुमकीन है, असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. (हेही वाचा - Mahrashtra Government Formation Live Updates: राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांची विधिमंडळपदी निवड)
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यघटनेचा अनादर करुन मुख्यमंत्र्यांनी सर्वांना अंधारात ठेऊन शपथ घेतली. तसेच राज्यपालांनी राज्यघटनेचा रक्षक म्हणून आपली भूमिका पार पाडली नाही, असा आक्षेप घेतला आहे. आमदारांची बोली लावणे हाच भाजपचा खरा चेहरा आहे.
रणदीप सुरजेवाला यांचे ट्विट -
November 23 will be registered as a black day in history of Maharashtra, Indian democracy: Congress
Read @ANI story | https://t.co/Z6Uj9pNtmN pic.twitter.com/HEjhGaWNUm
— ANI Digital (@ani_digital) November 23, 2019
कर्नाटक, उत्तरांचल, अरुणाचल प्रदेश, मेघालय आणि गोवा यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्रतही लोकशाहीची हत्या करण्यात आली असल्याचं म्हटलं आहे. रणदीप सुरजेवाला यांनी यावेळी भाजप पक्षाच्या सत्तास्थापनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले.