Madhya Pradesh News: मध्य प्रदेशातील इंदौर येथील नागरी परिक्षेची तयारी करणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. गावात राहणाऱ्या आईच्या निधनाची बातमी कळताच तरुणीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिस या प्रकरणी तपास करत आहे. या घटनेनंतर गावात मोठी खळबळ उडाली आहे. निकेशा असे मृत तरुणाचे नाव आहे. ( हेही वाचा- मुंबईत BMC कर्मचाराने राहत्या घरात घेतला गळफास, सुसाईट नोटमध्ये लिहलं कारण)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकेशा ही शहरातील वसतिगृहात राहात होती. 2019 मध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सब-इन्स्पेक्टर रँक परीक्षेची तयारी करत होती. तिचा भाऊही परीक्षेची तयारी करत होता. तिने सकाळी आईला फोन करून तब्येत विचारली तर तेव्हा तब्येत बिघडत असल्याचे सांगितले. आईला बघण्यासाठी तिला गावी जावे लागणार होते. वर्षभरापूर्वीच निकेशाच्या वडिलांचे निधन झाले होचे. त्यानंतर ती थोडी तणावात गेली. दुसऱ्या दिवशी त्यानंतर तिने गावाला कोणाला तरी फोन केला आणि आई विषयी विचारणा केली. रविवारी रात्री आईचे निधन झाल्याचे निकेशाला समजलं.
या गोष्टीचा निकेशाला धक्का बसला आणि सकाळी तिनं राहत्या खोली गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.