Mumbai News: मुंबईत BMC कर्मचाराने राहत्या घरात घेतला गळफास, सुसाईट नोटमध्ये लिहलं कारण
Suicide | (Photo Credits: unsplash.com)

Mumbai News: मुंबईत (Mumbai) एका 44 वर्षीय BMC कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.वरिष्ठांकडून कामावर छळ होत असल्याने टोकाचे पाऊल उचलेले आहे. सुभाष सोनावणे असं मृताचे नाव असून तो पी वॉर्ड येथे नोकरीला होता. मुंबईतील जोगेश्वरी येथील राहत्या घरी गळफास लावली. घटनास्थळी मृताकडून सुसाईट नोट सापडली. पोलिसांनी सुसाईट नोट जप्त केली.सुसाईट नोट मध्ये आत्महत्याचं कारण लिहल.  (हेही वाचा- सोशल मीडियावर ओळख झालेल्या तरुणीवर बलात्कार,)

मिळालेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी पश्चिम येथील आनंद नगर येथे सुभाष सोनावणे राहत होता आणि हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या आपल्या आजारी मुलीची काळजी घेण्यासाठी त्याने सुट्टी घेतली होती. कनिष्ठ पर्यवेक्षक कोटेंनी नोव्हेंबर 2023 मध्ये सोनवणे यांच्याकडून 10,000 रुपये घेतल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे. या वर्षी 10 जानेवारी रोजी सोनवणे यांनी पुन्हा ड्युटी सुरू करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपी आणि पर्यवेक्षकांनी त्यांना पुन्हा रुजू होऊ दिले नाही. त्यांचा छळ करू लागले.

ज्यात कनिष्ठ पर्यवेक्षक जिओ कोटेन आणि एका अज्ञात पर्यवेक्षकावर सोनवणे यांना महिनाभराच्या रजेनंतर पुन्हा ड्युटीवर रुजू होण्याच्या बदल्यात आर्थिक मदत मागितल्याचा आरोप आहे. सुसाईट नोट मध्ये लिहल्याप्रमाणे कोटेने आणि अन्य पर्यवेक्षक छळ करत असल्याचं लिहलं ते कामावर रुजू होवून देत नाही. 10,000 ते 5,000 रुपयांची मागणी करत होते. सतत च्या छळाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले. राहत्या घरात त्यांनी गळफास लावून घेतला. या घटनेची माहिती मिळताच, स्थानिकांनी त्यांना कुपर रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तेथे त्यांना मृत घोषित केले. पोलिस या प्ररकणी चौकशी करत आहे.