
Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील ग्वालियरमध्ये 13 फेब्रुवारी रोजी सकाळी एका मुलाचे अपहरण करण्यात आले होते. पोलिसांची कारवाई सुरु असल्याचे कळल्यानंतर मुलाला गावाच्या बाहेर सोडून अपहरणकर्ते पसार झाले. मुरैना जिल्ह्यातील माता बसई पोलीस ठाण्याच्या बंसीपुरा भागात एका वीटभट्टीजवळ अपहरणकर्त्यानी मुलाला सोडल्याची माहिती समोर आली आहे. 13 फेब्रुवारी रोजी सकाळी मुलाची आई त्याला शाळेत सोडत असताना दोन अपहरणकर्ते तिथे येऊन मुलाच्या आईला धक्काबुक्की करू लागले त्यांनी महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून मुलाचे अपहरण केले होते. यामुळे संपूर्ण मध्य प्रदेशात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर ग्वालियर पोलिसांनी 12 तासात मुलाला शोधून काढले आणि मुलाला सुखरूप घरी सोडले. मूल घरी परतल्यानंतर आई-वडिलांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
येथे पाहा व्हिडीओ:
अपने लाडले बेटे शिवाय के वापस घर लौटने की खुशी में मां हुई भावुक.....#gwaliornewslive #Gwalior #news pic.twitter.com/ZUgAf5flCR
— Gwalior News Live (@GwaliorNewsLive) February 13, 2025
घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर मुलाला सुखरूप परत आणणे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले होते. मात्र, पोलिसांनी मुलाला शोधून काढले. मुलाचे अपहरण झाल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली होती. अपहरणानंतर ग्वाल्हेर, मुरैना आणि भिंड येथील पोलिस विभागातील अधिकारी आणि कर्मचारीही मुलाच्या शोधात गुंतले होते. ठिकठिकाणी नाका बंदी करण्यात आली होती. अखेर १२ तासांत मुलगा सुखरूप सापडला.
रिक्षा चालकाने मुलाला रडतांना पहिले आणि काझी बासी गावच्या सरपंचाच्या स्वाधीन केले. सरपंचांनी मुलाच्या पालकांशी संपर्क साधला. मुलाला मुरैना पोलिस अधीक्षक कार्यालयात नेण्यात आले आणि पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.