Lok Sabha Elections 2019: नावडत्या उमेदवाराला आईने दिले मत; मुलाने फोडले EVM
Vandalizing EVM Machine | (Photo Credits-Twitter/ANI)

Lok Sabha Elections 2019: आईने आपल्या आवडत्या उमेदवाराला मत दिले नाही. त्यामुळे चिडलेल्या मुलाने थेट Electronic Voting Machines (EVM) तोडण्याचाच प्रताप केला. बिहार राज्यातील सारण लोकसभा मतदारसंघ (Saran Lok Sabha constituency) अंतर्गत येणाऱ्या सोनपूर विधनसभा मतदार संघातील यमुना सिंह मध्य विद्यालयात असलेल्या मतदान केंद्र क्रमांक 131 मध्ये ही घटना घडली. लोकसभा निवडणूक 2019 साठी एकूण सात टप्प्यात पार पडत असलेल्या मतदान प्रक्रियेचा पाचवा टप्पा आज देशभरातील विविध राज्यात पार पडत आहे.

प्राप्त माहितीनुसार, रणजीत पासवान असे EVM फोडणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. रणजीत पासवान हा मदहल्ली चक वॉर्ड सदस्याचा मुलगा आहे. तो आपल्या आईला मतदानसाठी मतदान केंद्रावर घेऊन गेला होता. दरम्यान, आईने रणजीत याला अपेक्षीत असलेल्या उमेदवाराला मत दिले नाही. त्यामुळे संतापलेल्या रणजीत याने संतापाच्या भरात थेट EVM तोडले. या प्रतापानंतर उपस्थित रुरक्षारक्षकांनी रणजीत याला पोलिसांच्या हवाली केले. त्यानंतर मतदान केंद्रावर दुसरे EVM मशीन उपलब्ध करुन देण्यात आले. नवीन EVM मशीन येताच काही काळ स्थगित झालेले मतदान पुन्हा सुरु झाले. (हेही वाचा, अमेठी: काँग्रेस पक्षाला मत देण्यासाठी महिलेवर दबाव, व्हिडिओ व्हायरल (Video))

ज्या लोकसभा मतदारसंघात हा प्रकार घडला. तो मतदारसंघ हा अत्यंत चर्चीत आणि हायहोल्टेज उमेदवारांचा मतदारसंघ म्हणून ओळकला जातो. या मतदारसंघातून भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी हे निवडणूक लढवत आहेत. आहेत. तर, त्यांच्या विरोधात महागठबंधन उमेदवार चंद्रिका राय मैदानात आहेत.