Lok Sabha Elections 2019 First Phase Poll: लोकसभा निवडणुकीसाठी विदर्भात 7, देशातील 84 मतदारसंघात उद्या मतदान होणार
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

Lok Sabha Elections 2019 First Phase Poll: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी उद्यापासून (11 एप्रिल) सुरुवात होणार आहे. तसेच 18 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 91 मतदारसंघासाठीच्या प्रचार तोफा मंगळवारी थंडावल्या. तर महाराष्ट्रातील विदर्भाच्या (Vidharbha) ठिकाणी  नागपूर, रामटेक, यवतमाळ-वाशिम, चंद्रपूर, भंडार-गोंदिया, वर्धा आणि गडचिरोली-चिमूर या मतदारसंघासाठी उद्या मतदान होणार आहे. त्याचसोबत आंध्र प्रदेश, सिक्किम, अरुणाचल विधानसभेच्या जागांसह ओडिशा येथे विधानसभेच्या 28 जगांसाठी प्रचाराची तोफ थंडावली आहे.

आंध्र प्रदेश (25), अरुणाचल प्रदेश (2), मेघालय (2), उत्तराखंड (5), मिझोराम (1), नागालॅण्ड (1), सिक्किम (1), मणिपूर (1), त्रिपुरा (1), तेलंगणा (17) या राज्यांतील, तसेच लक्षद्वीप (1) आणि अंदमान, निकोबार (1) मधील सर्व जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. त्याचसोबत ओडिशा (4), आसाम (5), बिहार(4), छत्तीसगड (1), जम्मू आणि काश्मिर (2), उत्तर प्रदेश (8), पश्चिम बंगाल(2) आणि महाराष्ट्र (7) या ठिकाणीसुद्धा प्रचारसभा थंडावल्या आहेत.

तर विदर्भात 14 हजार 189 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. नक्षलग्रस्त गडचिरोली भागात 500 अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर सुरक्षा यंत्रण कठोर करण्यात येणार आहे. तसेच मतदानापूर्वी जनमत चाचण्यांचा सरासरी निष्कर्ष काढल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रालोआचे सरकार निसटत्या बहुमताने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच पुलवामा हल्ल्यानंतर मोदी सरकारने केलेल्या कामगिरीची सुद्धा त्यांना फायदा रालोआला होण्याची शक्यता आहे. परंतु भाजपची पुन्हा एकदा देशात सत्ता येऊ नये यासाठी विरोधी पक्ष एकवटले असून त्यासाठी प्रयत्न करत आहेत. (हेही वाचा-Lok Sabha Elections 2019 First Phase Poll: विदर्भातील सात मतदारसंघांमध्ये प्रचारतोफा आज थंडावणार, 11 एप्रिलला मतदान)

तसेच विदर्भात भाजपाध्यक्ष अमित शहा, राजनाथ सिंह. राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार प्रफुल्ल पवार, देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या टप्प्यातील मतदान होण्यापूर्वी प्रचारसभा घेतल्या होत्या. त्याचसोबत राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांनी सुद्धा येथे शक्तीप्रदर्शन केले होते.