Lok Sabha Elections 2019 First Phase Poll: विदर्भातील सात मतदारसंघांमध्ये प्रचारतोफा आज थंडावणार, 11 एप्रिलला मतदान

आज संध्याकाळी पाच वाजता महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील प्रचार थंडावेल. 11 एप्रिलला मतदान होईल तर 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

Lok Sabha Elections 2019 First Phase Poll: विदर्भातील सात मतदारसंघांमध्ये प्रचारतोफा आज थंडावणार, 11  एप्रिलला मतदान
Political Parties in Maharashtra (File Photo)

Maharashtra First Phase Lok Sabha Elections Polls: आज संध्याकाळी पाच वाजता लोकसभा निवडणूक 2019 साठी पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचारतोफा थंडावणार आहेत. देशासह महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान 11 एप्रिलला होणार आहे. वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा- गोदिया, गडचिरोली- चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ - वाशिम या सात मतदारसंघांमध्ये होणार पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. यामध्ये नितीन गडकरी(Nitin Gadkari), भावना गवळी (Bhavna Gawali), माणिकराव ठाकरे (Manikrao Thackeray) यासारख्या दिग्गज राजकारण्यांचे भवितव्य मतदान पेटीमध्ये बंद होणार आहे. (नक्की वाचा: महाराष्ट्र लोकसभा निवडणूक मतदान पहिला टप्पा तारीख, मतदारसंघ आणि उमेदवार यादी)

महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानामध्ये गडचिरोली- चिमूर हा भाग नक्षलग्रस्त असल्याने तेथे मतदानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 अशी मर्यादीत करण्यात आली आहे.

  • पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी एकूण 116 उमेदवार आहेत.
  • सात मतदारसंघात 14 हजार 919 मतदान केंद्र आहेत तर 1 कोटी 30 लाख 35 हजार मतदार आहेत.
  • सुमारे 44 हजार ईव्हीएम यंत्र आणि 20 हजार व्हीव्हीपॅट यंत्र देण्यात आले आहेत. सुमारे 73 हजार 837 कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत.
  • ज्या मतदारसंघात 15 पेक्षा जास्त उमेदवार आहेत, अशा मतदान केंद्रांवर 2 बॅलेट युनिट बसविण्यात येतात. त्यासोबत 1 कंट्रोल युनिट असते. पहिल्या टप्प्याकरिता 26 हजार बॅलेट युनिट आणि 18 हजार कंट्रोल युनिट देण्यात आले असून 20 हजार व्हीव्हीपॅट यंत्र उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

चुरसीची लढत

पहिल्या टप्प्यातील मतदानामध्ये नागपूरात नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले आणि यवतमाळ वाशिममध्ये भवाना गवळी विरूद्ध माणिकराव ठाकरे यांच्यामधील लढत चुरशीची होणार आहे. माध्यमांशी बोलताना नितीन गडकरी यांनी किमान 5 लाख माताधिक्क्याने जिंकून येऊ असा विश्वास बोलून दाखवला आहे. आज संध्याकाळी पाच वाजता महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील प्रचार थंडावेल. 11 एप्रिलला मतदान होईल तर 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Apr 09, 2019 12:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).