चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगात थैमान घातले आहे. जगभरात आणि भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. दरम्यान, सर्वसामन्यांपासून तर अनेक राजकीय नेते, कलाकार, खेळाडू कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहेत. यातच आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अगरवाल (Lav Agarwal) यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. स्वत: लव अगरवाल यांनी यासंदर्भात ट्विट करून ही माहिती दिली आहे. तसेच प्रोटोकॉलनुसार आपण होम क्वारंटाईन असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. यामुळे सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.
“माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे आणि मार्गदर्शक सूचनांनुसार मी होम क्वारंटाईन राहणार आहे. माझ्यासोबत कार्यरत असलेले कर्मचारी आणि मित्रांनी स्वत:कडे लक्ष द्यावे. संपर्कात आलेल्या लोकांची माहिती आरोग्य विभागाकडून घेतली जाईल,” अशा आशयाचे ट्वीट लव अगरवाल यांनी केले आहे. हे देखील वाचा- Amit Shah Tests COVID 19 Negative: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोरोनामुक्त; पुढील काही दिवस होम आयसोलेशन
एएनआयचे ट्वीट-
Lav Agarwal, Union Health Ministry Joint Secretary, tested positive for #COVID19 pic.twitter.com/OiSATsp2MK
— ANI (@ANI) August 14, 2020
भारतामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा आता 24 लाख 60 हजारांच्या पार गेला आहे. देशात गेल्या 24 तासांत नव्या 64,553 रूग्नांना कोरोनाची लागण झाली आहे. तर सुमारे 1007 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. भारतामध्ये सध्या 6 लाख 61 हजार 595 जणांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत 17 लाख 51 हजार 556 रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने त्यांना रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत भारतात कोरोनामुळे मरण पावलेल्या रुग्णांची संख्या 48 हजार 40 वर पोहचली आहे.