Amit Shah Tests COVID 19 Negative: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोरोनामुक्त; पुढील काही दिवस होम आयसोलेशन
अमित शहा (Photo Credits-ANI)

भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)  यांनी आज (14 ऑगस्ट) ते कोरोनामुक्त झाल्याची माहिती झाली आहे. दरम्यान 2 ऑगस्टला करण्यात आलेल्या अमित शाह यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर आज 12 दिवसांनी अमित शाह यांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान त्यांच्या दिल्लीच्या मेदांता रूग्णालयामध्ये उपचार सुरू होते.

ट्वीटरच्या माध्यमातून माहिती देताना आज अमित शाह यांनी या काळात त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टर, नर्स स्टाफचे आभार मानले आहेत.  सोबतच ईश्वराचे आभार मानत त्यांनी कुटुंबीयांचे मनोधैर्य वाढवलेल्यांचेही आभार मानले आहेत.  तर पुढील काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार होम क्वारंटीन राहणार असल्याचेही त्यांनी ट्वीट मध्ये नमूद केले आहे.

Amit Shah Tweet

9 ऑगस्ट दिवशी भाजपा खासदार मनोज तिवारी यांनी अमित शाह यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्याचं ट्वीट केले होते परंतू काही वेळातच गृहमंत्रालयाने त्यावर खुलासा करत अद्याप अमित शाह यांची चाचणी झाली नसल्याचं म्हटलं होतं. मात्र आज खुद्द अमित शाह यांनीच कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्याचं सांगत त्यांच्या समर्थकांना दिलासा दिला आहे. Amit Shah COVID-19 Test: अमित शाह कोरोना मुक्त झाल्याचे मनोज तिवारी यांचे ट्विट; केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले 'हे' स्पष्टीकरण

55 वर्षीय अमित शाह यांना दीर्घकालीन आजाराचा धोका आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात होती. दरम्यान त्यांना उच्च मधुमेह आहे. मागील वर्षी त्यांच्यावर  lipoma च्या उपचारांसाठी शस्त्रक्रिया देखील झाली आहे.