नक्षल कनेक्शन प्रकरणी आरोपींची नजरकैद वाढवली
(संग्रहीत आणि संपादित प्रतिमा)

नवी दिल्ली: नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन तसेच, कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या ५ मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या नजरकैदेत वाढ करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ही नजरकैद सोमवारपर्यंत वाढवण्यात आली. या प्रकरणावर आता सोमवारी (१७ सप्टेंबर) सुनावणी होणार आहे.

कोरेगाव-भीमा हिंसाचार आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या कथीत संशयावरुन पुणे पोलिसांनी ५ जणांना अटक केली. वरवरा राव, सुधा भारद्वाज, गौतम नवलाखा, वेर्नोन गोन्साल्वीस आणि अरुण फरेरा अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत. या पाचही जणांवर नक्षलवाद्यांशी संबंध ठेवल्याचा आरोप पोलिसांनी ठेवला आहे.