Kanpur Police: उत्तर प्रदेशातील कानपूर मध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका पोलिसांनी अधिकाऱ्यासमोबर एका दुकानदाराला काना खाली मारली आहे. परिसरात पोलिसांना दुकानदारांकडून निषेध केला जात आहे. निषेध केल्यानंतर पोलिसांनी दुकानदाराला धमकावले आहे. या घटनेची व्हिडिओ व्हायरल होत आहे. एसीपीने दुकानदाराला सांगितले की, तीन पोलिस ठाण्यांतून पोलिस फौज आणेल. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलीस अधिकाऱ्याच्या कारवाईवर व्यापारी संतप्त झाले असून त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. (हेही वाचा- अगदी वाह्यात प्रकार, कॅमेरात झाला कैद,)
ये कानपुर पुलिस है। दुकान में घुसकर दुकान मालिक को तमाचा जड़ दिया। फिर कहा, अभी तीन थानों का फोर्स बुलाएंगे।
खूब मारिए, इस दुकानदार को! आम आदमी है न! आशु दिवाकर और अंकित शुक्ला के मामले में इतनी ऐंठन कहां चली गई थी? #Kanpur #UPPolice @NBTLucknow pic.twitter.com/waREeLcmNq
— Praveen Mohta (@MohtaPraveenn) December 20, 2023
दुकानदाराने काही चुकीचे केले असेल तर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे. शिसामाळ बाजारपेठेतील अतिक्रमणांवर शिसामाळ पोलीस कारवाई करत असताना हा प्रकार उघडकीस आला.या घटनेची माहिती पसरताच परिसरातील इतर व्यावसायिकांनी सिसामाळ पोलिस ठाण्याला घेराव घातला आणि पीडितेला थप्पड मारणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर तसेच पोलिस अधिकाऱ्याच्या कृतीचे समर्थन करणाऱ्या एसीपी श्वेता कुमारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
दिनांक 20.12.2023 को थाना सीसामऊ अन्तर्गत पैदल गश्त के दौरान पुलिस द्वारा अतिक्रमण हटाने के लिए दुकानदारों से बात की जा रही थी इसी दौरान दोनों पक्षों के मध्य कहासुनी हो गयी जिसके सम्बन्ध में एडीसीपी सेन्ट्रल महोदया द्वारा दी गई बाइट। @Uppolice pic.twitter.com/nXpqRUD5at
— POLICE COMMISSIONERATE KANPUR NAGAR (@kanpurnagarpol) December 20, 2023
बाजारपेठेतील बेकायदा अतिक्रमणांविरोधात पोलिस कारवाई करत असताना पोलिस अधिकारी आणि दुकानदार यांच्यात वादावादी झाली. हा व्यापारी बाजारपेठेत पोलिसांकडून केलेल्या कारवाईचा व्हिडिओ रेकॉर्ड करत होता आणि पोलिसांनी त्याला रेकॉर्डिंग थांबवण्यास सांगितले. व्यावसायिकाने पोलिसांवर आक्षेप घेतल्याने अधिकाऱ्याने पोलिस उपायुक्त (एसीपी) श्वेता कुमारी यांच्यासमोरच त्याला रागाच्या भरात थप्पड मारली.