मुंबई मध्ये एका Railway Protection Force महिला कर्मचार्‍याने कर्तव्यदक्ष राहत चालत्या ट्रेन मधून उतरताना प्लॅटफॉर्मवर पडलेल्या मुलीला वाचवलं आहे. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. 33 सेकंदाचा हा व्हिडिओ हृद्याचा ठोका चूकवणारा आहे. चालत्या गाडीतून तरूणी उतरत असताना तिचा तोल गेला आणि ती खाली कोसळली. आरपीएफ जवानाने तेव्हा तत्परता दाखवत तिला वाचवलं अन्यथा ती चाकाखाली जाण्याची शक्यता होती. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेकडून सातत्याने चालत्या ट्रेन मध्ये चढणे-उतरणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. Central Railway RPF Saves 86 Lives: कौतुकास्पद! मध्य रेल्वेच्या RPF जवानांनी 2022-23 मध्ये वाचवले 86 लोकांचे प्राण .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)