RPF jawans saved passenger lives (PC- Twitter)

Central Railway RPF Saves 86 Lives: रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (Railway Protection Force, RPF) कर्मचारी नेहमीच आघाडीवर असतात. केवळ रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठीच नव्हे तर इतर ड्युटी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने रेल्वे प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी चोवीस तास जागरुक असतात. मध्य रेल्वेच्या RPF जवानांनी "मिशन जीवन रक्षक" चा एक भाग म्हणून मध्य रेल्वेवर एप्रिल 2022 ते मार्च 2023 या कालावधीत आतापर्यंत 86 लोकांचे प्राण वाचवले आहेत. या जीव वाचवणाऱ्या घटनांचे काही व्हिज्युअल इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आणि सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या 86 घटनांपैकी एकट्या मुंबई विभागात 33 जीव वाचवणाऱ्या घटनांची नोंद झाली आहे. नागपूर विभागात 17 जीव वाचवण्याच्या घटनांची, पुणे विभागात 13 घटनांची, भुसावळ विभागात 17 आणि सोलापूर विभागात 06 घटनांची नोंद करण्यात आली आहे. (हेही वाचा - Mankhurd Railway Station Video: आरपीएफ जवानांनी वाचवले चालत्या ट्रेनमधून पडलेल्या महिला आणि मुलाचे प्राण, मानखूर्द येथील घटना)

रेल्वे संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यांना प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेवरील गुन्हे, अतिरेकी हिंसाचार, ट्रेनच्या वाहतुकीत अडथळा आणणे, बेपत्ता मुलांची सुटका करणे, रेल्वे परिसरात अंमली पदार्थ जप्त करणे, प्रवाशांचे सामान परत मिळवणे इत्यादी विविध सुरक्षा आव्हानांचा सामना करावा लागतो. (हेही वाचा - Mumbai: मुंबईतील वडाळा स्थानकात RPF कॉन्स्टेबलने वाचवला प्रवाशाचा जीव, पहा व्हिडिओ)

रेल्वे संरक्षण दलाचे जवान प्रवाशांच्या सुरक्षेवर बारीक लक्ष ठेवून असतात. आरपीएफ जवानाच्या सतर्कतेने आतापर्यंत अनेक प्रवाशांचे प्राण वाचवण्यात आले आहेत. यापूर्वी धावत्या ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरतानाचे अनेक धोक्यादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काही प्रकरणांमध्ये वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांनाही आरपीएफ जवानांनी रोखलं आहे. प्रवाशांनी धावत्या ट्रेनमध्ये चढून किंवा उतरून आपला जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.