RJD leader Lalu Prasad Yadav | File Image (Photo Credit: PTI)

Lalu Prasad Yadav Fodder Scam Case: चारा घोटाळा प्रकरणातील (Fodder Scam Case) दोषी आरजेडी नेते लालू प्रसाद यादव (RJD leader Lalu Prasad Yadav) यांना चारा घोटाळा खटल्यांमधून मोठा दिलासा मिळाला आहे. रांची उच्च न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर केला आहे. 9 एप्रिल रोजी सुनावणीसाठी या खटल्याची नोंद करण्यात आली होती. परंतु, सीबीआयने आपला जबाब दाखल करण्यासाठी कोर्टाकडे वेळ मागितला होता. लवकरचं लालू प्रसाद यादव तुरूंगातून मुक्त होतील. आरजेडी सुप्रीमोवर सध्या दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरू आहेत.

जामीन अर्जावर निकाल देताना रांची हायकोर्टाने लालूंना जामिनासाठी एक लाख रुपये देण्यास सांगितलं आहे. तसेच दहा लाख रुपये दंडाची रक्कम जमा करावी लागणार आहे. याशिवाय त्यांना पासपोर्ट जमा करावा लागेल. लालू प्रसाद यादव कोर्टाच्या परवानगीशिवाय परदेशात जाऊ शकणार नाही. तसेच त्यांना आपला पत्ता आणि मोबाइल नंबर बदलता येणार नाही. (वाचा - Medical Oxygen Shortage: 'या' राज्यात वैद्यकीय ऑक्सिजनची सर्वाधिक कमतरता; वाहतुकीमध्ये का येत आहे अडथळा? जाणून घ्या)

आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांच्या जामिनावर शुक्रवारी रांची उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, कोरोना विषाणूच्या संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी उच्च न्यायालयाचा परिसर बंद ठेवण्यात आला होता. यामुळे आता शनिवारी त्याच्या जामिनावर सुनावणी झाली. न्यायाधीश अपरेश कुमार सिंह यांच्या न्यायालयात रांची उच्च न्यायालयात हा खटला नोंदविण्यात आला. आज सीबीआयने जामिनाला विरोध दर्शविणारे उत्तर दाखल केले.

दरम्यान, 2005 मध्ये बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या नेतृत्वात नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स (एनडीए) चे नवे सरकार स्थापन झाले, तेव्हा लालूंच्या राजकारणाला ग्रहण लागले. परंतु, लालूंनी दिल्लीत आपले स्थान भक्कम केले. त्यांनी केंद्र सरकारमध्ये रेल्वेमंत्री म्हणून पदभार स्विकारला. त्यावेळी तोट्यात जाणारी रेल्वे प्रथमचं नफ्यात आली होती.