Jharkhand Crime: दारूच्या नशेत लोकं काय करतील याचा नेम नसतो. अशीच धक्कादायक घटना झारखंड मध्ये घडली आहे. चक्क दारूच्या नशेत एका व्यक्तीने चक्क वडलांचा जीव घेतला आहे. वडिल्यांचा डोक्यावर लोखंडी रोडने मारल्याची घटना झारखंड राज्यातील चतरा जिल्ह्यातील  घडली आहे. मद्यपी मुलाने वयोवृध्द वडिलांच्या डोक्यात रागाच्या भरात मारलं आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.   स्थानिकांनी ताबडतोब पोलीसांना तक्रार केली.  काली भुईया असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

पोलीसांना कळताच घटनास्थळी धाव घेतला. पोलीस येण्याच्या आधी आरोपी फरार झाला आहे. मृतदेह पोलीसांनी ताब्यात घेतला आणि त्याला पोस्टमार्टमसाठी पाठण्यात आला आहे. काली यांचा मुलगा मुन्नी भुईया (३५ वर्षे) हा मद्यधुंद अवस्थेत आपल्या मुलाला मारहाण करत होता. ते थांबवण्यासाठी व नातवाला वाचवण्यासाठी काली हे मध्ये पडले.

या हल्ल्याचा व घटनेला लेखी अर्ज मिळाल्याचे पोलिसांनी नमूद केले. लवकरच या संपूर्ण प्रकरणाचा तपास करून आरोपीला अटक करून कारागृहात पाठवण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.