Image For Representation (Photo Credits: Facebook)

कार्यालयात महिला कर्मचाऱ्यासोबत शरीरसंबंध ठेवणाऱ्या कर्नलचा बिंग फुटले असून याप्रकरणी लष्कराकडून कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहे. संबंधित कर्नलच्या वागणुकीवर संशय आल्याचे 25 राजपूताना रायफल्सच्या 2 जवानांनी त्यांच्यावर निगरानी ठेवायला सुरूवात केली. दरम्यान कर्नल हे कार्यलयात महिला कर्मचाऱ्यासोबत शरीरसंबंध ठेवत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी कर्नलचा अश्लील व्हिडिओ (Video Clip) काढून सरंक्षण मंत्री यांना पत्राच्या माध्यमातून कळवले आहे. यानतंर याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती इंडियन एक्सप्रेसने दिली आहे.

एका कर्नलने कर्मचारी महिलेशी शारीरिक संबंध ठेवल्याची घटना पंजाब येथील आहे. दरम्यान, 2 जवानांनी या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ काढला आहे. व्हिडिओमधील महिला सैन्यातील नसून ती नागरी सेवा क्षेत्रात नोकरी करत असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी 2 जवानांनी दोन जवानांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहून कळवल्यानंतर, या प्रकरणात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. हे प्रकरणावरून पडदा उठताच लष्काराने कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत. महत्वाचे म्हणजे कर्नल आता सेवेतून निवृत्त झाल्याचे समजते आहे. हे देखील वाचा- मुंबई: फेसबूकवर लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ अपलोड; 17 जणांविरोधात गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नल जावनांना वाईट वागणूक द्यायचा. यामुळे त्याला धडा शिकवण्यासाठी हा व्हिडिओ बनवल्याचे जवानांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे. यामुळे या दोन जवानांनी कर्नलचे ब्लॅकमेलिंग तर केले नाही ना, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. कर्नला आता लष्करी सेवेतून निवृत्त झाला असला तरी, लष्कराच्या नियमानुसार त्याला चौकशीला सामोरे जावे लागेल. तसेच या घटनेतील महिलाचेही चौकशी केली जात आहे.