मुंबई: फेसबूकवर लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ अपलोड; 17 जणांविरोधात गुन्हा दाखल

चाईल्ड पॉर्नोग्राफी (Child Pornography) रोखण्यासाठी प्रशासनाकडून अनेक प्रयत्न केले जात असताना मुंबई (Mumbai) येथील नालासोपारा (Nalasopara) येथे लहान मुलांचे अपलोड केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. फेसबूकने (Facebook) स्वत: याची तक्रार दाखल केल्यानंतर 17 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप यापैकी कोणालाही अटक केली नाही. ही घटना मुंबई शहरातील नालासोपारा परिसरात घडली आहे. धक्कादायक म्हणजे, भारतातून सर्वाधिक चाईल्ड पोर्नोग्राफी ही फेसबुकच्या माध्यमातून अपलोड केली जात असल्याचे फेसबुकनेच जाहीर केले आहे. तसेच सर्वाधिक फेसबुक चाईल्ड पोर्नोग्राफी ही दिल्लीतून अपलोड होते, तर यात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे, अशी माहिती फेसबुकने दिलेल्या अहवालात म्हटले आहे.

चाईल्ड पोर्नोग्राफीचे अनेक प्रकरण समोर येत आहेत. यातच फेसबुकवर लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ अपलोड केले जात आहेत, अशी तक्रार फेसबुकने दाखल केली आहे. याप्रकरणी मुंबई येथील नालासोपारा परिसरात राहणाऱ्या 17 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेसबूक अपलोड होणाऱ्या पोर्नोग्राफी रोखण्यासाठी खुद फेसबूकने केंद्र सरकारकडे अपील केली होती. वरील प्रकरणातील कोणत्याही आरोपीला अटक झाली नसून आयपी ऍड्रेसच्या माध्यमातून त्यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणातील आरोपी वय 20 ते 35 वयोगटातील आहेत, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. हे देखील वाचा- पुणे: Child Pornography चे व्हिडीओ अपलोड करणाऱ्या तिघांना अटक; खडक पोलिसांची कारवाई

चाईल्ड पॉर्न बनवणे, पाहणे, फॉरवर्ड करणे आणि त्याला प्रोत्साहन देणे भारतात कायद्याने गुन्हा आहे, असे असतानाही अशा घटना सातत्याने समोर येणे हे धक्कादायक असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येते आहे. याप्रकरणी पोलिसात पोलिसांत अनेक गुन्हे दाखल झाले असून यावर कायमचा आळा घालण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. पुणे शहरातून गेल्या दीड वर्षात चाइल्ड पोर्नोग्राफीचे तब्बल 150 व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड करण्यात आले आहेत. पुणे पोलिसांच्या सायबर सेलने यांसदर्भात माहिती दिली होती. याप्रकरणात 2 जणांना अटकही करण्यात आली आहे. या संदर्भात खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.