Director General of Police Dilbag Singh(Photo Credits: IANS)

पाकिस्तान (pakistan) सीमेवर समस्या निर्माण करण्याचे प्रयत्न करीत आहे. परंतु पाकस्तानचे प्रयत्न मोडीत काढण्यासाठी भारतीय सैनिक (Indian Force)  तयारीत असल्याचे वक्तव्य जम्मूकाश्मीरचे (Jammu Kashmir) पोलिस प्रमुख दिलबाग सिंह (Dilbag Singh) यांनी केले आहे. जम्मूकाश्मीरला विशेष राज्याचे दर्जा देणारे अनुच्छेद 370 (Artical 370) रद्द केल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात अधिक तणाव निर्माण झाला आहे. एवढेच नव्हे तर, जम्मू काश्मीरमध्ये सर्वत्र अशांतता पसरली आहे. मात्र,पाकिस्तान भारताच्या अंतर्गत मुद्यासंदर्भात हस्तक्षेप करत असल्याचे समोर आले आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू काश्मीर येथील बाजारपेठ, व्ययसाय अजूनही सुरळीत झाले नाही. या परिसरातील सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या वाहनाच्या संख्येत कमरता भासली आहे. तसेच शहरातील काही भागात खाजगी वाहन आणि ऑटोरिक्षा धावत आहेत. त्याचबरोबर काही छोटे व्यवसायिकही दिसले आहेत. माध्यमिक स्तरावरील शाळा सुरू करण्याचा राज्य प्रशासनाचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे, कारण पालक आपल्या मुलांना घरीच ठेवत आहेत. हे देखील वाचा-जम्मू-काश्मीरच्या सद्यस्थितीवर सरन्यायधीश रंजन गोगोई म्हणाले, गरज भासल्यास मी स्वतः श्रीनगरला जाईल.

ट्विट-

दिलबाग सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू काश्मीर येथील सरकारी कार्यालये कार्यरत आहेत. सध्या सार्वजनिक वाहतुकीच्या अभावामुळे कार्यालयात कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी आहे. जिल्हा मुख्यालयांच्या कार्यालयांमध्ये सामान्य उपस्थिती नोंदविण्यात आली. जम्मू काश्मीरमधील परिसरात टेलीफोनची सुविधा सुरु करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे, ऑगस्ट महिन्याच्या ५ तारखेपासून काही भागात अजूनही मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद आहे.