पुलवामा येथील चकमकीत भारतीय लष्कराकडून 3 दहशतवाद्यांचा खात्मा
Indian Army (Photo Credits-File Photo)

पुलवामा (Pulwama) जिल्ह्यात भारतीय लष्कर (Indian Army) आणि दहशतवाद्यांमध्ये (Terrorist) आज चकमक झाली. यात भारतीय लष्कराने 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या चकमकीत ठार झालेले दहशतवाद्यांपैकी दोघेजण पाकिस्तानचे (Pakistan) नागरीक असून एक जण जैश-ए-मोहम्मद संघटनेत सक्रीय असल्याचे समजले. भारतीय लष्कराकडून करण्यात आलेल्या कारवाईचा एक व्हिडिओ एएनआयच्या वृत्त संस्थेने ट्विटर माध्यमातून शेअर केला आहे. यात भारतीय लष्कर आणि दहशतवादी यांच्यात गोळीबार होत असल्याचे दिसत आहे.

अवंतीपुरातील एका घरामध्ये काही दहशतवाद्यांनी आश्रय घेतला आहे, अशी माहिती भारतीय लष्कराच्या कानावर पडली. त्यानंतर भारतीय लष्काराकडून अवंतीपुरा परिसरात युद्धपातळीवर शोधमोहीम सुरु करण्यात आली. त्याचबरोबर संपूर्ण परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. तसेच राजपुरा गावाकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. दरम्यान, दहशतवादी ज्या घरात लपून बसले होते. त्या ठिकाणी भारतीय लष्काराने घेराव घातला. त्यानंतर दहशतवाद्यांनी भारतीय लष्काराच्या दिशेने गोळीबार करायला सुरुवात केली. तब्बल चार तास सुरु असलेल्या चकमकीनंतर भारतीय लष्काराने 3 दहशतवाद्यांना जागीच ठार केले. यावेळी भारतीय लष्करासह सीआरपीएफचे जवान आणि एसओजीचे पथकही हजर होते. हे देखील वाचा- भारतीय लष्कराची पीओकेत कारवाई; पाकिस्तानचे 4 सैनिक ठार

एएनआयचे ट्वीट-

ज्या ठिकाणी हे दहशतवादी राहत होते, त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आढळून आला आहे. दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून यापैकी दोघे जण पाकिस्तानचे नागरिक असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.