
जर तुम्ही यूपीआय पेमेंट अॅप्स Google Pay, PhonePe, किंवा Paytm वापरत असाल तर ही महत्त्वाची नक्की जाणून घ्या. 1 एप्रिल पासून नबे यूपीआय पेमेंट नियम लागू होणार आहेत. National Payments Corporation of India च्या माहितीनुसार, जे मोबाईल नंबर फार काळ वापरले गेलेले नाहीत ते मोबाईल नंबर बॅंक अकाऊंट मम्धून अनलिंक होणार आहेत. जर तुमचं बॅंक अकाऊंट एखाद्या सक्रिय नसलेल्या मोबाईल नंबरशि लिंक असल्यास तो डीलीट होणार आहे. त्यामुळे त्याच्या आधारे यूपीआय पेमेंट देखील होऊ शकणार नाही.
NPCI कडून हे पाऊल वाढत्या सायबर फ्रॉड ला रोखण्यासाठी आणि टेक्निकल इश्यू टाळण्यासाठी उचलावे लागले आहे. जर एखादा मोबाईल नंबर फार काळ इनअॅक्टिव्ह राहिला असेल तर टेलिकॉम कंपनी तो नंबर दुसर्या व्यक्तीला देऊन टाकू शकते.
जर हा नंबर पूर्वी बँक खात्याशी जोडलेला असेल आणि नवीन यूजरने त्याचा गैरवापर केला तर फसवणुकीचा धोका वाढतो. सोबतच बँका आणि UPI प्रणालीमधील तांत्रिक समस्यांमुळे चुकीचे व्यवहार किंवा पेमेंट अयशस्वी होऊ शकतात. NPCI चे ध्येय UPI अधिक सुरक्षित करणे आणि यूजर्सना कोणतीही गैरसोय होऊ नये हे सुनिश्चित करणे आहे.
यूपीआय व्यवहारांसाठी मोबाईल नंबर का आवश्यक?
तुमचा मोबाईल नंबर UPI पेमेंटसाठी ओळख म्हणून काम करतो. जेव्हा तुम्ही एखाद्याला पैसे पाठवता तेव्हा बँक तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP पाठवते जेणेकरून व्यवहार अधिकृत झाला आहे आणि पैसे योग्य व्यक्तीकडे जातात याची खात्री होईल.
जर तुमचा नंबर बराच काळ निष्क्रिय राहिला आणि दुसऱ्याला दिला गेला तर त्यामुळे चुकीचे व्यवहार होऊ शकतात किंवा निधी चुकीचा ट्रान्सफर होऊ शकतो. यामुळे तुमचे पैसे दुसऱ्याच्या खात्यात ट्रान्सफर होऊ शकतात.
आता काय करू शकाल?
जर तुमच्या बँक खात्याशी जोडलेला मोबाईल नंबर बराच काळ वापरात नसेल किंवा बंद असेल किंवा रिचार्ज झाला नसेल, तर तुम्ही तो ताबडतोब तपासा. तुमच्या नावावर अजूनही नोंदणीकृत आहे की नाही याची पुष्टी करण्यासाठी तुमच्या जिओ, एअरटेल, व्हीआय किंवा बीएसएनएल सारख्या टेलिकॉम ऑपरेटर शी संपर्क साधा.
जर तुमचा नंबर बंद झाला असेल, तर तुम्ही तो पुन्हा सक्रिय करा किंवा तुमचे बँक खाते नवीन मोबाइल नंबरने अपडेट करावे. यामुळे भविष्यात UPI व्यवहारांमध्ये येणाऱ्या कोणत्याही समस्या टाळण्यास मदत होईल.