Image used for representational purpose | (Photo Credits: Unsplash.com)

JEE Main 2021: राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (NTA) फेब्रुवारी सत्रात जेईई मुख्य परीक्षेच्या 2021 च्या पहिल्या टप्प्यातील अर्जाची प्रक्रिया उद्या संपणार आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अद्याप अर्ज केला नाही त्यांनी अधिकृत वेबसाइट, jeemain.nta.nic.in वर भेट देऊन शक्य तितक्या लवकर अर्ज करावा. उमेदवारांसाठी ही शेवटची संधी आहे. यापूर्वी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी होती, जी एनटीएने 23 जानेवारीपर्यंत वाढविली होती.

या स्टेपच्या साहाय्याने करा ऑनलाईन अर्ज -

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करावे. Jeemain.nta.nic.in. मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या अर्जांसाठी जेईई (मुख्य) 2021 लिंकवर क्लिक करा. आता आपणास नवीन टॅबवर आणले जाईल. येथे न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करा. आता ऑनलाइन अर्ज करण्याशी संबंधित सूचना व कार्यपद्धती तपासा आणि प्रक्रिया पुढे प्रोसीड करा. यानंतर विनंती केलेली माहिती एंटर करुन सबमिट करा. आता आपल्याला अॅप्लीकेशन नंबर आणि पासवर्ड मिळेल. आता मागील पृष्ठावर परत या आणि आपला अॅप्लीकेशन नंबर आणि पासवर्ड प्रविष्ट करुन साइन इन करा. साइन इन केल्यानंतर आपण पुढील अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता. (वाचा -JEE Main 2021: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, जेईई मेन परीक्षेसाठी 12 वी मध्ये 75 टक्के गुण अनिवार्य नाही- रमेश पोखरियाल निशंक)

राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने जेईई मेन 2021 च्या अर्जामध्ये दुरुस्तीसाठी नवीन तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार, उमेदवार आता 27 जानेवारी ते 30 जानेवारी 2021 पर्यंत त्यांच्या अर्जाच्या फॉर्ममध्ये बदल करू शकतील. यासाठी सुधार विंडो अधिकृत वेबसाइट, jeemain.nta.nic.in वर उपलब्ध असेल. यापूर्वी 19 ते 21 जानेवारी या कालावधीत अर्ज सुधारणे आवश्यक होते. परंतु, अर्ज भरण्यासाठी अंतिम तारीख वाढविण्याबरोबरच अर्जात सुधारणा करण्याच्या तारखाही वाढविण्यात आल्या. करेक्शन विंडो उघडल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या अर्जामध्ये चुकीच्या पद्धतीने प्रविष्ट केलेला तपशील दुरुस्त करता येईल.