Aadhaar Card For Children: आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे. हे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) द्वारे जारी केले जाते. मुलाला शाळेत प्रवेश देण्यापासून ते विविध सरकारी योजनांतर्गत लाभ मिळवण्यापर्यंत आधारची मागणी केली जाते. यावरून आधारचे महत्त्व किती आहे, याचा अंदाज येतो. तुमच्या मुलांकडे आधार कार्ड नसेल, तर ठराविक वेळेत आधार बनवून घ्या, असे शाळा सांगत आहेत.
मुलांचे आधार कार्ड कसे काढतात? याबाबत पालकांच्या मनात अनेकदा अनेक प्रश्न असतात. मुलांना आधार मिळवण्यासाठी पालकांना कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे देत UIDAI ने ट्विट केले आहे, ज्यामध्ये नवजात किंवा 5 वर्षाखालील मुलांचे आधार कार्ड काढण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत हे सांगण्यात आलं आहे. चला त्याबद्दल जाणून घेऊया…(वाचा - LIC PAN Card Link for IPO: एलआईसी आईपीओसाठी तुमच्या पॉलिसी खात्याशी अपडेट करा पॅन कार्ड! अन्यथा करावा लागेल पश्चाताप)
आई किंवा वडिलांचे आधार कार्ड -
UIDAI च्या ट्विटनुसार, 5 वर्षांखालील मुलांचे आधार बनवण्यासाठी पालकांपैकी एकाकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. 5 वर्षांखालील मुलांसाठी आधार बनवण्यासाठी, तुम्हाला आधार केंद्र किंवा जन सुविधा केंद्राला भेट द्यावी लागेल. जिथे पालकांपैकी एकाचे आधार देऊन मुलाचे आधार कार्ड बनवता येते.
मुलाच्या जन्म प्रमाणपत्रावरून आधार कार्ड -
UIDAI च्या नियमांनुसार, मुलाचे आधार कार्ड जन्म प्रमाणपत्रावरून देखील बनवले जाऊ शकते. यासाठी हॉस्पिटल, नगरपालिका किंवा महानगरपालिकेकडून बनवलेले जन्म प्रमाणपत्र मिळवता येते. ज्याच्या मदतीने मुलाचे आधार कार्ड बनवता येते.
Your #Aadhaar along with the child's #birth certificate or the discharge slip you received from the hospital is enough to enroll your child for Aadhaar.
List of other documents that may be used for the child's #enrolment: https://t.co/BeqUA0pkqL #KidsAadhaar pic.twitter.com/lNsGIDHMSU
— Aadhaar (@UIDAI) February 28, 2022
हॉस्पिटल डिस्चार्ज स्लिप -
प्रसूतीदरम्यान हॉस्पिटलमधून मिळालेल्या डिस्चार्ज स्लिपच्या मदतीने मुलाचे आधार कार्ड देखील बनवले जाऊ शकते. यासाठी तुम्हाला हॉस्पिटलमधून वैध डिस्चार्ज स्लिप घ्यावी लागेल. याद्वारे नवजात मुलाचे आधार कार्ड बनवता येईल.