Spicejet | Image used for representational purpose only | (Photo Credits: PTI)

स्पाईज जेट (SpiceJet ) या विमान सेवा देणार्‍या कंपनीने त्यांच्या भारत आणि युएई मधील प्रवाशांसाठी एक महत्त्वाची सेवा उपलब्ध करून दिली आहे. दरम्यान कोविड 19 च्या संकटात आता प्रवासापूर्वी कोविड 19 टेस्ट बंधनकारक असल्याने ती घरबसल्या उपलब्ध करून दिली जात आहे. स्पाईस जेटचे प्रवासी आता भारत (India) आणि युएई (UAE) मध्ये प्रवासापूर्वी स्पाईस जेटच्याच वेबसाईटवर जाऊन ही सेवा घेऊ शकता. RT-PCR Tests रिपोर्ट निगेटिव्ह असलेल्यांनाच प्रवासाची मुभा असल्याने आणि नेमकं कोणी कुठे टेस्ट करून घ्यावी याबद्दल समान्यांच्या मना संभ्रम असल्याने स्पाईस जेटने त्यांच्या वेबसाईटवर ही प्रवाशांसाठी खास सोय खुली केली आहे. RT-PCR, Antigen, Antibody Test: कोविड 19 चं निदान करण्यासाठी केल्या जाणार्‍या विविध COVID Tests टेस्ट मधील नेमका फरक काय ते कोणती चाचणी कधी करावी?

आगामी सणासुदीचा काळ आहे. त्यानिमित्ताने तुम्ही थोडं बाहेर पडणार असाल, विमान प्रवास करणार असाल आणि जर तुम्ही स्पाईस जेटचे प्रवासी असाल तर पहा टेस्टचं बुकिंग कसं कराल?

RT-PCR Tests SpiceJet च्या साईट वरून कशी बुक कराल?

  • SpiceJet च्या अधिकृत संकेतस्थळावर जा.
  • होम पेजवरच तुम्हांला टेस्ट दिसेल तिथे बूक नाऊ वर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्ही भारत की युएई मधून प्रवास करणार आहात ते निवडा.
  • बुक नाऊ वर क्लिक करून शहर, लोकेशन, तारीख, वेळ निवडा.
  • पुढे तुम्हांला नाव, जन्मतारीख, फोन नंबर, इमेल अशी माहिती भरावी लागेल.

भारतामध्ये सेंटरवर जाऊन किंवा लॅब मधील व्यक्ती घरी येऊन तुमची सॅम्पल्स घेऊन जातील आणि रिपोर्ट्स देतील. तर दर हे स्थानिक राज्यातील सरकारने ठरवलेल्या रेंज मध्ये असतील. युएई मधून प्रवास करणार्‍यांसाठी ते AED 160 इतके असतील.तुमचा रिपोर्ट रजिस्टर इमेल आयडी वर किमान 24 ते 60 तासांमध्ये पाठवला जाणार आहे. नागरिकांना मोठा दिलासा! राज्यात कोरोना चाचण्यांच्या दरात चौथ्यांदा घट; प्रती तपासणीमागे 200 रुपये कमी.  

दुबई मध्ये भारतीयांना प्रवास करायचा असेल तर त्यांना प्रवासापूर्वी 96 तास आधी केलेला टेस्ट रिपोर्ट सादर करणं बंधनकारक आहे. भारतातून फ्रान्समध्ये जाणार्‍यांनाही अशाप्रकारे आरटीपीसीआर टेस्ट गरजेचि करण्यात आली आहे.