कोरोना चाचण्यांच्या दरात (Corona Tests Rate) चौथ्यांदा घट करण्यात आली आहे. खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठीचे दर प्रति तपासणी सुमारे 200 रुपयांनी कमी करण्यात आले आहेत. या नव्या दरानुसार चाचण्यांसाठी 980, 1400 आणि 1800 रुपये असा कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक दर खासगी प्रयोगशाळांना आकारता येणार नाही. 4500 रुपयांवरुन 980 रुपयांपर्यंत इतके कमी दर निश्चित करुन सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सांगितले आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना राजेश टोपे यांनी सांगितले की, कोरोना चाचण्यांचे दर निश्चित करताना तीन टप्पे करण्यात आले असून प्रयोगशाळेत तपासणी केल्यावर 980 रुपये दर आकारण्यात येईल. कोविड सेंटर, रुग्णालये, क्वारंटाईन सेंटरमधील प्रयोगशाळा येथून सॅम्पल गोळा करुन तपासणी करण्यासाठी 1400 रुपये तर रुग्णाच्या घरी जाऊन सॅम्पल घेऊन तपासणी करण्यासाठी 1800 रुपये असा कमाल दर आता निश्चित करण्यात आला आहे. सामान्य माणूस केंद्र स्थानी ठेवून राज्य शासनाने सातत्याने दरामध्ये घट करुन रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं. (हेही वाचा - Rane Vs Thackeray: 'उद्धव ठाकरे म्हणजे दोन्ही बाजुला जाणारं गांडूळ, बेईमानी करून पद मिळवल्याचा' नारायण राणे यांचा पलटवार)
दरम्यान, राज्यात कोरोना नियंत्रणासाठी चाचण्यांवर भर देण्यात येणार असून प्रती दहा लाख लोकसंख्येमागे 70 हजार चाचण्या केल्या जात आहेत. त्या वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. जेणेकरुन कोरोनावर अधिक नियंत्रण मिळविता येईल. राज्यभरात सुधारित दरानुसार रुग्णांकडून पैसे आकारले जावेत यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांनी दक्षता घ्यावी, असे आवाहनदेखील यावेळी आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.
राज्यात #कोरोना चाचण्यांच्या दरात चौथ्यांदा घट. खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठीचे दर प्रति तपासणी सुमारे २०० रुपयांनी केले कमी. नव्या दरानुसार चाचण्यांसाठी ९८०, १४०० आणि १८०० रुपये असा कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक- आरोग्यमंत्री @rajeshtope11 pic.twitter.com/jOWdZbZ5DE
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) October 26, 2020
याशिवाय कोरोना चाचण्यांचे दर निश्चित करताना तीन टप्पे करण्यात आले असून प्रयोगशाळेत तपासणी केल्यावर 980 रुपये दर आकारण्यात येईल. कोविड सेंटर, रुग्णालये, क्वारंटाईन सेंटरमधील प्रयोगशाळा येथून सॅम्पल गोळा करुन तपासणी करण्यासाठी 1400 रुपये तर रुग्णाच्या घरी जाऊन सॅम्पल घेऊन तपासणी करण्यासाठी 1800 रुपये असा कमाल दर आता निश्चित करण्यात आला आहे. सामान्य माणूस केंद्र स्थानी ठेवून राज्य शासनाने सातत्याने दरामध्ये घट करुन रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे.