SBI Recruitment 2022: एसबीआय मध्ये 48 पदांवर होतेय Assistant Managers पदांवर नोकरभरती; 25 फेब्रुवारी पर्यंत sbi.co.in वर करा अर्ज
SBI (Pic Credit- SBI Twitter)

बॅंक नोकरीच्या शोधात असणार्‍यांसाठी एक आनंददायक बाब आहे. दरम्यान स्टेट बॅंक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी आहे. एसबीआयने सध्या त्याबाबतचं एक नोटिफिकेशन जारी केले आहे. एसबीआय कडून Specialist Cadre Officer पदासाठी नोकरभरती होणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी SBI Recruitment 2022, notification नीट वाचण्याचं आवाहन करण्यात आले आहे. एसबीआय या नोकरभरती द्वारा 48 पदांवर

Assistant Manager as specialist Cadre officer नियुक्त करणार आहेत. 5 फेब्रुवारी पासून त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑनलाईन अर्जासाठी एसबीआय वेबसाईट sbi.co.in ला भेट द्यावी लागणार आहे. हे देखील नक्की वाचा: Bank of Maharashtra Recruitment 2022: बॅंक ऑफ महाराष्ट्र मध्ये 500 जागांवर Generalist Officer पदांवर नोकरीची संधी; bankofmaharashtra.in वर 22 फेब्रुवारी पर्यंत करा अर्ज!

5 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी या काळात उमेदवारांना अर्ज करण्याची मुभा आहे. Assistant Manager (Network Security Specialist) च्या 15 जागा असतील तर Assistant Manager (Routing & Switching)च्या 33 जागा असणार आहेत. वयाची कमाल मर्यादा 40 वर्ष आवश्यक आहे.  इथे पहा अधिकृत नोटिफिकेशन.

दरम्यान उमेदवारांची निवड ही ऑनलाईन लेखी परीक्षेद्वारा आणि मुलाखत फेरीमधून होणार आहे. लेखी परीक्षा 100 गुणांची असेल. त्यासाठी 80 प्रश्न आणि 120 मिनिटांची वेळ असेल. लेखी परीक्षेमधून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी मुलाखत फेरीसाठी बोलावले जातील. अंदाजे ऑनलाईन लेखी परीक्षा 20 मार्च 2022 दिवशी होणार आहे. या करिता अर्ज करताना General, OBC, EWS प्रवर्गातील उमेदवारांना 750 रूपये भरावे लागणार आहेत. SC, ST, Pwd प्रवर्गातील उमेदवारांसाठी अ‍ॅप्लिकेशन फी माफ असेल.