Fixed Deposits वर 'या' 6 बँकांमध्ये  मिळेल सर्वाधिक व्याज; उत्तम रिटर्नची हमी
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-PTI)

Top Bank FD Rates / Fixed Deposits Latest Interest Rates: फिक्स्ड डिपॉझिट बचतीचा एक सुरक्षित पर्याय आहे. त्यामुळे तरुणांपासून ते अगदी ज्येष्ठांपर्यंत सर्वजण बचतीसाठी या पर्यायाची निवड करतात. फिक्स्ड डिपॉझिटमध्ये सातत्याने व्याज मिळत असून रिटर्नची हमी असते. त्याचबरोबर वेगवेगळे व्याजदर आणि बाजारभावात होणारा चढ-उतार याची चिंता नसते. त्याचबरोबर गुंतवणूकदारांना आयकर मध्येही सूट मिळते. दरम्यान, देशातील विविध बँका रक्कम आणि अवधी यानुसार वेगवेगळ्या ऑफर्स देतात. या योजना कार्यरत व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिक या दोघांसाठी वेगवेगळ्या असतात. सर्वसाधारणपणे ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर जास्त व्याज मिळते.

दरम्यान, मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी किंवा आपल्या सध्याच्या कोणत्याही एफडीचे नूतनीकरण करण्यापूर्वी देशातील आघाडीच्या बँकांनी ऑफर केलेल्या नवीनतम ठेवींच्या दरांची तुलना करणे महत्वाचे आहे. पाहुया आपल्यासाठी चांगले व्याज देणाऱ्या मोठ्या बँकांच्या सर्वोत्तम फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) विषयी माहिती... (Kisan Vikas Patra Scheme: किसान विकास पत्र योजनेद्वारे पैसे होतील दुप्पट; जाणून घ्या गुंतवणूकीच्या या सुरक्षित पर्यायाबद्दल)

   बँक एफडी चे व्याजदर      अवधी
      नियमित ग्राहक   वरिष्ठ नागरिक
 स्टेट बँक ऑफ इंडिया 5.10% 5.60% 2 वर्षांपेक्षा अधिक-3 वर्ष
 पंजाब नेशनल बँक 5.20% 5.70% 365 दिवस
 एचडीएफसी बँक 4.90% 5.40% 365 दिवस
 बँक ऑफ बडोदा 5.0% 5.50% 1 वर्ष ते 400 दिवस
 कॅनरा बँक 5.25% 5.75% 1 वर्ष
आयसीआयसीआय बँक 5.0% 5.50% 18 महिने ते 2 वर्षापर्यंत

(हे ही वाचा: Paytm बँकेत FD वर मिळेल 7% व्याज; IndusInd Bank सोबत भागीदारी करुन पेटीएमची युजर्ससाठी खास सुविधा)

वास्तविक ठेवी प्रत्येकासाठी गुंतवणूकीचा सर्वात सोपा आणि सुरक्षित पर्याय आहे. यामुळे, लोकांना मुदत ठेवींमध्ये सर्वाधिक रस आहे. सामान्य माणसाने नेहमीच एफडी ला पसंती दर्शवली आहे.