SBI ग्राहकांसाठी खुशखबर; SBI ATM मधून करा फ्री अनलिमिटेड ट्रान्झॅक्शन
SBI बँक (File Photo)

आपल्या ग्राहकांसाठी नवनव्या सुविधा आणण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) अलिकडे नवनवी पाऊलं उचलत आहे. अलिकडेच स्टेट बँकेने जुने चेकबूक बदलण्याची घोषणा केली. त्यानंतर आता एटीएमची (ATM) नवी सुविधा सादर केली आहे. या सुविधेअंतर्गत तुम्ही एटीएम मधून कितीही पैसे काढू शकता आणि त्यासाठी तुम्हाला कोणताही चार्ज लागणार नाही. मात्र त्यासाठी तुम्हाला काही विशिष्ट अटी पाळाव्या लागतील. 1 डिसेंबर पूर्वी SBI बॅंकेत ही '4' कामं उरका नाहीतर मोठं नुकसान !

ग्राहकांना महिन्यातील ठराविक वेळा फ्री आणि अनलिमिडेट ट्रान्झॅक्शनची सुविधा बँकेने उपलब्ध करुन द्यायला हवी, असे आदेश रिजर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) स्टेट बँकेला दिले आहेत.

# एटीएममधून कोणताही चार्ज न देता अनलिमिटेड ट्रान्झॅक्शन (Transaction) करायचे असल्यास तुमच्या अकाऊंटमध्ये मिनिमम बॅलन्स असणे गरजेचे आहे. जुने ATM Card 1 जानेवारीपासून होणार बंद; असे घ्या बदलून

# अकाऊंटमध्ये मिनिमम बॅलन्स ठेवणारे ग्राहक स्टेट बँक ऑफ इंडिया ग्रुप (SBG) च्या ATM  मधून अनलिमिडेट फ्री ट्रान्झॅक्शन करु शकतात.

# ऑक्टोबर 2018 पासून स्टेट बँकने आपल्या क्लासिक आणि मायक्रो डेबिड कार्ड धारकांसाठी डेली कॅश विड्रॉल लिमिट 40,000 वरुन कमी करत 20,000 रुपये करण्यात आले आहे.

# स्टेट बँकेच्या फ्री अनलिमिटेड ट्रान्झॅक्शनचा लाभ घ्यायचा असल्यास तुम्हाला अकाऊंटमध्ये कमीत कमी 25000 रुपये ठेवणे गरजेचे आहे.

सध्या एसबीआय ग्राहकांना महिन्याला 8 ट्रान्झॅक्शन फ्री मिळतात. यात तुम्ही 5 ट्रान्झॅक्शन SBI ATM मधून तर 3 ट्रान्झॅक्शन इतर ATM मधून करु शकता. यापेक्षा अधिक वेळा पैसे काढल्यास 5 रुपये ते 20 रुपये + जीएसटी असा चार्ज लागतो.