प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

रेल्वेने आपण सर्वजण प्रवास तर करतो खरे परंतु रेल्वे प्रशासनाच्या काही नियमांची माहितीसुद्धा आपल्याला असणे तितकेच महत्वाचे आहे. तर 1 एप्रिल पासून तिकिट बुकिंग संबंधित नियमात बदल करण्यात आला आहे.

त्यामुळे विमान प्रवासाकरीता लागू असणार नियम म्हणजे संयुक्त पीएनआर (PNR) क्रमांक आता रेल्वे प्रवासासाठी सुद्धा लागू होणार आहे. या नियमाचा फायदा आता अशा प्रवाशांना होणार आहे जे प्रवासी कोणत्याही स्टेशनवर पोहचण्यासाठी 2 कनेक्टिंग ट्रेनमधून प्रवास करणार आहेत. त्यामुळे आता जरी तुमची कनेक्टिंग ट्रेन सुटल्यास तुम्हाला आता अतिरिक्त शुल्काशिवाय तिकिट रद्द करता येणार आहे.(हेही वाचा-रेल्वे प्रशासनाने सीट रिझर्व्हेशनसाठी लागू केले नवे नियम, तिकिट बुक करण्यापूर्वी हे लक्षात ठेवा)

तिकिटाबद्दल हा नियम सर्व क्लाससाठी लागू असणार आहे. तसेच तिकिटाचे पूर्ण रिफंड प्रवाशांना मिळणार आहे. तसेच कनेक्टिंग ट्रेनमधून यात्रा करत असल्यास तुमच्या नावे 2 पीएनआर क्रमांक दिले जाणार आहेत. परंतु हे दोन्ही पीएनआर क्रमांक लिंक केलेले असणार आहेत.