PAN Card धारकांसाठी 31 डिसेंबर अतिशय महत्त्वाचा; वेळीच काम आटोपा, अन्यथा पॅन कार्ड ठरेल अवैध
Aadhaar-PAN Linking |(Photo Credits: File Photo)

PAN-Aadhaar Link: तुम्ही जर पॅन कार्ड धारक (PAN Card Holders) आहात. तर आपला पॅन क्रमांक (PAN Number) आणि आधार क्रमांक (Aadhaar Number) एकत्र जोडून घ्या. महत्त्वाचे म्हणजे आधार (Aadhaar) आणि पॅन (PAN) आपल्याला लिंक (PAN Aadhar Link) करण्याची मुदच येत्या 31 डिसेंबरला संपत आहे. त्यामुळे आपल्यालाही वेळीच हे काम आटोपावे लागणार आहे. जर आपण असे केले नाही तर, आपले पॅन कार्ड अवैध (PAN Card Invalid) ठरण्याची शक्यता आहे. अवैध याचा अर्थ असे की, आपल्याकडे पॅन कार्ड नाही, असे मानले जाईल. म्हणजेच नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून (1 जानेवारी 2019) आपण गुंतवणूक, कर्ज अथवा आर्थिक व्यवहाराशी संबंधीत बँकेचे कोणतेही काम करु शकणार नाही. आपण आधार क्रमांकाशी आपला पॅन क्रमांक जोडल्यानंतर पुन्हा आपला पॅन कार्यकरत होणार आहे.

केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या वेळेनुसार 30 सप्टेबर हा दिवस आधार-पॅन जोडण्यासाठी अंतिम होता. मात्र, पुन्हा या मुदतीत वाढ करत ती 31 डिसेंबर 2019 अशी करण्यात आली. त्यामुळे ज्यांनी आधार-पॅन जोडले नाहीत त्यांच्यासाठी आता केवळ 27 दिवस उरले आहेत. (हेही वाचा, UIDAI PAN Card Update: आता Online पद्धतीने पॅन कार्ड करा अपडेट; @ tin.nsdl.com वर अप्लाय करा )

आपल्याला जर आधार आणि पॅन कार्ड एकमेकांशी जोडायचे असतील तर, आयकर विभागाचे अधिकृत संकेतस्थळ www.incometaxindiaefiling.gov.in जा. डाव्या बाजूला 'Link Aadhaar' या पर्यायावर क्लिक करा. इथे आपले खाते उघडेन. जर आपले खाते उघडले गेले नाही तर, पहिल्यांदा नोंदणी (रजीष्ट्रेशन) करा. लॉग इंन केल्यानंर उघडलेल्या पेजवर प्रोफाईल सेंटींग निवडा. आता आधार कार्ड लिंक असा पर्याय निवडा. इथे आपल्या आधार कार्डची माहिती किंवा कॅप्चा कोड भरा. त्यानंतर खाली असलेला लिंक आधार हा पर्याय निवडा त्यावर क्लिक करा.

दरम्यान, आपण SMS सेवेचा लाभ घेहूनही आधार आणि पॅन जोडू शकता. त्यासाठी आपल्याला 567678 किंवा 56161 या क्रमांकावर SMS पाठावा लागेल. हा मेसेज पाठवल्यानंतर काही वेळात आपले आधार आणि पॅन क्रमांक एकमेकांशी जोडले जातील.