ONGC कडून 3614 Apprentice Vacancies जाहीर; 15 मे पूर्वी करा ongcindia.com वर अर्ज
Job | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

ONGC कडून 3614 Apprentice Vacancies जाहीर करण्यात आल्या आहेत. यासाठी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया 27 एप्रिल 2022 पासून सुरू करण्यात आली आहे. तर अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 15 मे च्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे. दरम्यान इच्छुक उमेदवार आपला अर्ज ONGC ची अधिकृत वेबसाईट ongcindia.com याद्वारा आपला अर्ज सादर करू शकतात.

निवडल्या गेलेल्या अंतिम उमेदवारांची यादी ओएनजीसी कडून 23 मे 2022 दिवशी जारी केली जाणार आहे.उमेदवार निवडताआ त्यांचे क्वालिफाईंग परिक्षेमधील मार्क्स ग्राह्य धरले जाणार आहेत. नक्की वाचा: MPSC Stenographer Recruitment 2022: दहावी पास उमेदवारांना नोकरीची संधी; 12 मे पूर्वी करा mpsconline.gov.in वर अर्ज .

ONGC Recruitment 2022 साठी अर्ज कसा कराल?

  • ONGC ची अधिकृत वेबसाईट ongcindia.com ला भेट द्या.
  • अत्यावश्यक माहिती भरा.
  • आवश्यक कागदपर स्कॅन करून भरा.
  • अ‍ॅप्लिकेशन फॉर्म सादर करा आणि त्याची प्रिंट आऊट काढून ठेवा.

या भरती मोहिमेद्वारे एकूण 3614 रिक्त जागा भरल्या जातील, ज्यात उत्तर क्षेत्रातील 209, मुंबई सेक्टरमध्ये 305, पश्चिम सेक्टरमध्ये 1434, पूर्व सेक्टरमध्ये 744, दक्षिण सेक्टरमध्ये 694 आणि मध्य क्षेत्रातील 228 जागांचा समावेश आहे.

दरम्यान ओएनजीसीमध्ये अर्ज करताना उमेदवार किमान वय 18 वर्षे आणि कमाल 24 वर्षे असणं आवश्यक आहे. अर्जदाराची जन्मतारीख (DOB) 15 मे 1998 ते 15 मे 2004 दरम्यान असावी. किमान वयोमर्यादा SC/ST साठी पाच वर्षे आणि OBC-NC/Ex-Servicemen/PwBD साठी तीन वर्षे शिथिल करून दिली जाणार आहे.

राज्य तंत्रशिक्षण मंडळ (SBTE)/नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग (NCVT) द्वारे मान्यताप्राप्त ITIs/ तांत्रिक संस्थांमधून उमेदवारांनी पात्रता परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.