Ola Credit Card: ओला कंपनीने एसबीआयसोबत लॉन्च केले क्रेडिट कार्ड, यूजर्सला मिळणार अधिक कॅशबॅक
Ola launches Credit Card services (Photo Credit: Twitter/@bhash)

Ola credit card: मोबाईल App बेस टॅक्सी सेवा देणारी कंपनी ओला (Ola) ने देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) सोबत मिळून एक ओला मनी एसबीआई क्रेडिट कार्ड (Ola Money SBI Credit Card)लॉन्च केले आहे. व्हिसा (Visa) पॉवर्ड प्रकारातील या कार्डवर सध्यातरी कोणतेही शुल्क नाही. या कार्डच्या माध्यमातून ओला युजर्ससाठी पेमेंट करने अधिक सोपे होणार आहे.

ओलाने 2022 पर्यंत 1 कोटी ओला मनी एसबीआय क्रेडीट कार्ड वितरित करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. ओलाने सन 2015 मध्ये ओला मनी लॉन्च केले होते. ओला ग्राहक या कार्डसाठी ओला अॅपच्या माध्यमातून अप्लाय करु शकतात. या अॅपच्या माध्यमातूनच क्रेडिट कार्डही मॅनेज करता येऊ शकते. यावर ग्राहकांना कॅशबॅक आणि रिवर्डही मिळणार आहे. हे कॅशबॅक ओला मनीमध्ये क्रेडिट होतील. ज्याचा वापर ओला राईड्स, फ्लाईट आणि हॉटेल बुकिंग करताना ग्राहकाला होऊ शकतो. (हेही वाचा, SBI चे ATM कार्ड अ‍ॅपच्या माध्यमातून On-Off द्वारे कंट्रोल करु शकता, तुमचे पैसे अधिक सुरक्षित राहणार)

ओलाचे सीईओ आणि को-फाऊंडर भाविष अग्रवाल यांनी सांगितले की, ओला मनी एसबीआय क्रेडिट कार्डच्या माध्यमातून देश डिजिटल इकनॉमीत पुढचे पाऊल टाकेल. त्यांनी असेही सांगितले की, या वेळी ओलाच्य प्लॅटफॉर्मवरवर 15 कोटींहून अधिक लोक जोडले गेले आहेत. आता हे युजर्स कार्डच्या माध्यमातून पेमेंट सेवेचा लाभ घेतील. एसबीआय कार्ड चे एमडी हरदयाल प्रसाद यांनी सांगितले की, या सेवेचा ग्राहकांना फायदा होईल.