भारतीयांसाठी पॅनकार्ड (PAN Card) हे महत्त्वाचे ओळखपत्र आहे. पूर्वी पॅनकार्डसाठी खूप काळ वाट पाहावी लागत असे. आता पॅनकार्ड मिळविण्याची प्रक्रिया अगदी सहज आणि झटपट झाली आहे. अवघ्या चार तासांत तुम्हाला तुमचे पॅनकार्ड मिळेल. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (CBDT)चे चेअरमन सुशील चंद्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयकर विभाग 4 तासांत पॅनकार्ड इश्यू करण्याच्या योजनेवर काम करत आहे. नक्की वाचा: 5 डिसेंबरपासून PAN Card मध्ये होणार 'हे' नवे बदल!
सीबीडीटी (CBDT) लवकरच म्हणजे अगदी 4 तासांच्या आत ई-पॅन देण्याची सुविधा सुरु करेल. यासाठी नव्या प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे 4 तासात पॅनकार्ड तयार करणे शक्य होईल. यावर्षी किंवा काही काळानंतर ही सेवा सुरु करण्यात येईल. यासाठी तुम्हाला विशेष काही करण्याची आवश्यकता नाही. आधार कार्डचे डिटेल्स द्यावे लागतील आणि 4 तासांत तुम्हाला तुमचे पॅनकार्ड मिळेल. त्यामुळे आता पॅनकार्ड मिळण्यासाठी तुम्हाला अधिक काळ वाट पाहावी लागणार नाही.
एप्रिल 2017 मध्ये सीबीडीटीने ई-पॅन कार्डची सेवा सुरु केली होती. या सेवेअंतर्गत प्रत्येक आवेदकाला ई-पॅनची सॉफ्ट कॉपी पीडीएफ फॉर्मेटमध्ये पाठवली जात होती. ती कॉपी डाऊनलोड करुन तुम्ही त्याचा उपयोग करु शकत होतात.
PAN म्हणजे परमनेंट अकाऊंट नंबर. यामध्ये 10 कॅरेक्टर्सचा अल्कान्युमरिक नंबर होता. यावरुन इनकम टॅक्स भरणाऱ्यांची माहिती टॅक्स डिपार्टमेंटला मिळते. याच्या आधारावरुन सरकारला नागरिकांचे आर्थिक व्यवहार समजतात. मोठे आर्थिक व्यवहार आणि इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासारख्या महत्त्वपूर्ण कामांसाठी पॅन कार्ड आवश्यक आहे.