ओळखपत्र असलेल्या आणि सरकारी-आर्थिक कामांसाठी महत्त्वाचे असलेल्या पॅनकार्डमध्ये (PAN card) काही बदल करण्यात येणार आहेत. आयकर विभागाने या संदर्भातील नियम जारी केले असून ते 5 डिसेंबरपासून लागू करण्यात येणार आहेत.
पॅन कार्डच्या अर्जामध्ये वडीलांच्या नावाविषयी असलेल्या नियमांमध्ये सवलत मिळविण्यासाठी आयकार विभागाकडे अनेक आवेदने जमा झाली होती. त्यानुसार पॅनकार्डमध्ये काही बदल करण्यात येणार आहेत.
पॅनकार्डमध्ये होणारे बदल:
# बदललेल्या नियमानुसार, पॅनकार्डवर वडीलांचे नाव लिहिणे अनिर्वाय असणार नाही.
# आई सिंगल पॅरेंट असलेल्या अर्जदारांसाठी सुधारीत नियम दिलासादायक आहेत. आई एकमेव पालक (सिंगल पॅरेंट) असणाऱ्या अर्जदारांना फक्त आईचे नाव पॅनकार्डवर लावण्याची इच्छा असल्यास तसा पर्याय ते निवडू शकतात.
# आर्थिक वर्षात 2.5 लाखांपेक्षा अधिक व्यवहार करणाऱ्यांसाठी पॅनकार्ड असणे बंधनकारक असणार आहे. मात्र यासाठी 31 मे 2019 पूर्वी पॅनकार्डसाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
# आर्थिक वर्षात 5 लाखांपेक्षा अधिक व्यवहार करणाऱ्यांकडे पॅनकार्ड नंबर असणे अनिर्वाय असणार आहे.
# बदललेल्या नियमांनुसार, घरगुती कंपन्यांना देखील पॅनकार्ड असणे आवश्यक असणार आहे. या कंपन्यांची आर्थिक वर्षात होणारी विक्री, टर्नओव्हर 5 लाखांपेक्षा कमी असले तरी पॅनकार्ड असणे बंधनकारक असणार आहे.
करचोरी थांबविण्यासाठी आणि काळा पैसा नियंत्रित करण्यासाठी हे नियम नक्कीच फायदेशीर ठरतील.