आता 25 करोड रुपयांच्या गुंतवणुकीच्या करावर Startups कंपन्यांना मिळणार सुट, टर्नओवरची लिमिट 100 करोड रुपये
प्रातिनिधिक प्रतिमा (फोटो सौजन्य-फेसबुक)

सरकारने नुकतीच स्टार्टअप कंपन्यांना आनंदाची बातमी दिली आहे. तर आता स्टार्टअप (Startup) कंपन्यांना 25 करोड रुपयांच्या गुंतवणुकीमधू जी रक्कम उपलब्ध होणार आहे त्यावर कर भरावा लागणार नाही आहे. यापूर्वी ही लिमिट 10 करोड रुपये होती. मंगळवारी (19 फेब्रुवारी) सरकारकडून याबाबत घोषणा करण्यात आली आहे. स्टार्टअप कंपन्यांना 30 टक्क्यांपर्यंत कर (Angel Tax) भरावा लागतो.

कंपन्यांनी त्यांचे रजिस्ट्रेशन केल्यानंतर 10 वर्षापर्यंत स्टार्टअपचा दर्जा राहणार आहे. त्याचसोबत स्टार्टअप कंपन्यांचा कालावधी मध्येही वाढ करण्यात आली आहे. तर यापूर्वी स्टार्टअपचा दर्जा 7 वर्षे ठेवण्यात आला होता. एवढच नसून कंपन्यांचे टर्नओवर वाढवले असून ते 100 करोड रुपये केले आहे. सरकारने देशात गेल्या वर्षात जानेवारी महिन्यात वाढत्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी 'स्टार्टअप इंडिया अॅक्शन प्लॅन' लॉन्च केला होता. या स्टार्टअपचे मुख्य उद्देश कर सवलत आणि हुकूमशाही पद्धती हटविण्याचा आहे.

डीआयपीपी यांनी देशभरात 14,600 स्टार्टअप उदयास आणले. त्यातील महाराष्ट्रातील सर्वात जास्त 2,587 स्टार्टअप आहेत. स्टार्टअप कंपन्या ह्या मुख्यत: नवीन इनोव्हेशन,तंत्रज्ञान आणि बौद्धिक संपदा संबंधित कामांशी निगडीत सर्विस देण्याचे काम करतात.