Ministry of Defence Recruitment 2021: संरक्षण मंत्रालयात 400 पदांसाठी भरती प्रक्रीया; अर्ज करण्याची आज शेवटची तारीख
Representational Image (Photo Credit: File Image)

सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असलेल्यांसाठी ही अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी आहे. संरक्षण मंत्रालयात (Ministry of Defence) ASC सेंटरसाठी सिव्हिल मोटर ड्रायव्हर, क्लीनर, कुक, एमटीएस आणि इतर तब्बल 400 पदांसाठी भरती सुरु झाली आहे. आज, 3 सप्टेंबर अर्ज करण्याची शेवटची तारीख असून ऑफलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करु शकता. सर्व आवश्यक कागदपत्रांसह अधिसूचनेत दिलेल्या पत्त्यावर इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज पाठवू शकतात. दरम्यान, या भरती प्रक्रीयेतील पदं, वयोमर्यादा, पात्रता आणि इत्यादी महत्त्वाची माहिती जाणून घेऊया... (NPCIL Recruitment 2021: न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये 107 जागांसाठी भरती, 'असा' करता येईल अर्ज)

पदं:

एएससी केंद्र (उत्तर)  (केवळ पुरुष उमेदवार)

सिव्हिल मोटर ड्रायव्हर: 115 पदं

क्लिनर: 67 पदं

कुक: 15 पदं

सिव्हिलियन केटरिंग इन्स्ट्रक्टर: 3 पदं

एएससी केंद्र (दक्षिण)

कामगार (पुरुष): 193 पदं

एमटीएस (सफाई कर्मचारी): 7 पदं

पात्रता:

मान्यताप्राप्त संस्थेतून मॅट्रिक परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

शैक्षणिक पात्रतेबद्दल तपशीलवार माहिती- http://www.davp.nic.in/WriteReadData/ADS/eng_10602_22_2122b.pdf

वयोमर्यादा:

सिव्हिल मोटर ड्रायव्हर पदासाठी उमेदवारांचे वय 18 ते 27 वर्षे.

तर पदांसाठी उमेदवारांचे वय 18 ते 25 वर्षे. (India Post Recruitment 2021: डाक विभागात MTS, LDC सह अन्य पदांवर नोकर भरती, 12 वी पास उमेदवारांना करता येईल अर्ज)

निवड प्रक्रीया:

कौशल्य, शारीरिक, सराव चाचणीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येईल. त्याचबरोबर आवश्यक असल्यास लेखी परीक्षाही घेण्यात येईल. या परीक्षांमधील गुणांच्या आधारे उमेदवाराची निवड करण्यात येईल. येथे पहा अधिकृत नोटीफिकेशन.

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या पात्र उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. दरम्यान, अर्ज करण्याची आज शेवटची तारीख असल्याने ही संधी अजिबात दवडू नका.