India Post Recruitment 2021: डाक विभागात MTS, LDC सह अन्य पदांवर नोकर भरती, 12 वी पास उमेदवारांना करता येईल अर्ज
India Post

India Post Recruitment 2021: ऑफिस ऑफ द चीफ पोस्टमास्टर जनरल, तेलंगणा सर्कल, हैदराबादने MTS (मल्टी टास्किंग स्टाफ), LDC (लोअर डिव्हिजन सर्कल), पोस्टल असिस्टंट (PA), सॉर्टिंग असिस्टेंट (SA), पोस्टमन/मेल गार्डच्या पदावर नोकर भरती केली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट tsposts.in/sportsrecruitment वर भेट द्यावी.

उमेदवारांना येत्या 24 सप्टेंबर पर्यंत अर्ज भरता येणार आहे. या नोकर भरती अंतर्गत एकूण 55 रिक्त पदांवर योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे. स्पोर्ट्स कोट्यातून उमेदवारांची भरती विविध पदांसाठी केली जाणार आहे. त्यासाठी निर्धारित योग्यता वेगळी असणार आहे. MTS पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने 10 वी पास असावे. तर अन्य पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने 12 वी मध्ये उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. शैक्षिक योग्यतेसाठी अतिरिक्त स्पोर्ट्स कोटा अंतर्गत महत्वाचे स्पोर्ट्स मधील प्रशिक्षण सुद्धा घेतलेले असावे.

India Post Recruitment 2021: पुढील पदांवर होणार नोकर भरती

>पोस्ट ऑफिसमध्ये डाक सहायक (PA)

>>रेल्वे मेल सेवा (RMS) कार्यालयांमध्ये सॉर्टिंग असिस्‍टेंट (SA)

>>पोस्टमन (Postman)

>>रेल्वे मेल सेवा (RMS) कार्यालयात मेल गार्ड (MG)

डाकघर/आरएमएस कार्यालय/डाक लेखा कार्यालय मध्ये MTS

MTS पदावर अर्ज करण्यासाठी 18-25 वर्ष वय असावे. त्याचसोबत अन्य पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 27 वर्षापर्यंत असावे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 200 रुपयांचा शुल्क भरावा लागणार आहे. त्याचोसबत अंतिम तारखेपूर्वी उमेदवारांनी अर्ज भरावा असे स्पष्ट करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.