भारतीय रेल्वेच्या 12 मे पासून सुरू होणार्‍या प्रवासी वाहतूकीसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून नियमावली जाहीर
Indian Railway| Photo Credits: Twitter / @PiyushGoyal

भारतामध्ये सध्या कोरोना व्हायरस लॉकडाऊन सुरु असला तरीही 12 मे पासून देशाच्या 15 विविध शहरांमध्ये भारतीय रेल्वेची प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे. दरम्यान उद्या 12 मे पासून ही वाहतूक सुरू होत असल्याने आज केंद्रीय गृहमंत्रालयाने त्याबाबतचा प्रोटोकॉल जाहीर केला आहे. केंद्रीय गृहखात्याच्या नियमावलीनुसार केवळ तिकीट आरक्षण मिळालेल्या प्रवाशांना या रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करण्याची मुभा दिली जाणार आहे. दरम्यान 12 मे पासून धावणार्‍या 30 रेल्वेच्या फेर्‍यांसाठी आज संध्याकाळी 4 वाजल्यापासून ई तिकीट बुकिंग सुरू होणार आहे. दरम्यान तुम्ही या प्रवासी ट्रेनने प्रवास करू इच्छित असाल तर या नियमांचं कठोर पालन करणं आवश्यक आहे. Indian Railways कडून 15 पॅसेंजर रेल्वे गाड्या 12 मे पासून धावणार पहा irctc.co.in वर त्याचं E-Tickets कसं बुक कराल?

प्रवासी रेल्वे वाहतूकीसाठी काय असतील नियम?

  • केवळ कंफर्म e-tickets असणारे प्रवासी पॅसेंजर ट्रेनने प्रवास करू शकतात.
  • सार्‍या प्रवाशांची सक्तीने आरोग्य चाचणी केली जाईल त्यामधूनची केवळ asymptomatic असणार्‍यांना गाडीमध्ये चढायला परवानगी असेल.
  • स्टेशन आणि कोचमध्ये प्रत्येक प्रवाशाला एंट्री आणि एक्झिट पॉंईंटवर हॅन्ड सॅनिटायझर दिले जाईल. तसेच प्रवासादरम्यान मास्क परिधान करणं सक्तीचे आहे.
  • प्रवाशांना रेल्वे सुटण्यापूर्वी 90 मिनिटं उपस्थित राहणं आवश्यक आहे.

दरम्यान 12 मे पासून   भारतीय रेल्वेच्या फेर्‍या मुंबई सेंट्रल, मडगाव, अहमदाबाद, जम्मू तावी, दिब्रुगड, रांची, भुवनेश्वर, आगरतळा, हावडा, पटना, बिलासपूर,बेंगळूरू, चैन्नई, तिरूअनंतपुरम या स्थानकासाठी सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 15 रेल्वे गाड्यांच्या येणार्‍या जाणार्‍या अशा 30 फेर्‍या सुरू केल्या आहेत. आजपासून सुरू होणारी ही तिकीट विक्री केवळ ऑनलाईन असेल. देशात कुठेच रेल्वे स्थानकांवर या प्रवासी वाहतूकीसाठी तिकिट बुकिंग तिकीटबारीवर खुले नसेल.  त्यामुळे प्रवाशांनी तेथे गर्दी टाळण्याचं आवाहनदेखील प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.