Job प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड कडून 300 हून अधिक जागांवर अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. www.mahadiscom.in या ऑनलाईन वेबसाईट वर इच्छूक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. यामध्ये उमेदवारांना मुंबई मध्ये नोकरीत रूजू केले जाणार आहे. या नोकर भरती मध्ये शैक्षणिक पात्रता पदांनुसार वेगवेगळी आहे. अतिरिक्त कार्यकारी अभियंता (वितरण) पदासाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजीमधील पदवी आवश्यक आहे. अतिरिक्त कार्यकारी अभियंता (सिव्हिल) पदासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजीमधील पदवी आवश्यक आहे. उपकार्यकारी अभियंता (वितरण) पदासाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजीमधील पदवी आवश्यक आहे. उपकार्यकारी अभियंता (सिव्हिल) पदासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजीमधील पदवी आवश्यक आहे. वरिष्ठ व्यवस्थापक पदासाठी सीए / आयसीडब्ल्यूए (सीएमए) फायनल पास असणे आवश्यक आहे. व्यवस्थापक पदासाठी सीए / आयसीडब्ल्यूए (सीएमए) फायनल पास असणे आवश्यक आहे. उपव्यवस्थापक पदासाठी सीए / आयसीडब्ल्यूए (सीएमए) / एम.कॉम. असणे आवश्यक आहे.

दरम्यान महावितरण कडून नोकर भरतीसाठी सविस्तर जाहिरात दिली आहे. वयोमर्यादेमध्ये अतिरिक्त कार्यकारी अभियंता (वितरण): 40 वर्षे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता (सिव्हिल): 40वर्षे, उपकार्यकारी अभियंता (वितरण): 35 वर्षे, उपकार्यकारी अभियंता (सिव्हिल): 35 वर्षे, वरिष्ठ व्यवस्थापक: 40 वर्षे, व्यवस्थापक: 40 वर्षे, उपव्यवस्थापक (एफ & ए): 35 वर्षे अशी वयोमर्यादा आहे.

महावितरणाच्या नोकर भरती मध्ये निवड प्रक्रिया ही ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीनंतर होणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सशुल्क आहे. खुला प्रवर्ग/ खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 500 रूपये आणि जीएसटी द्यावा लागणार आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 250 रूपये आणि जीएसटी द्यावा लागणार आहे.

इथे पहा सविस्तर जाहिरात

 

वेतनश्रेणी पदांनुसार पगार हा 54 हजार ते 1,84,000 पर्यंत असणार आहे.  मुंबईने जून २०२५ च्या जाहिरातीमध्ये एकूण ३०० रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे.