
सिलिंडर गॅस (Gas Cylinder) दरांबाबत एक महत्त्वाचे वृत्त आहे. यापुढे सिलिंडर गॅस दर (Gas Cylinder Rate ) प्रत्येक आठवड्याला कमी-अधिक होण्याची शक्यता आहे. सरकारी तेल कंपन्या याबाबत विचार करत असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे सिलिंडर गॅस दरांबाबत ठोस निश्चिती राहण्याची शक्यता कमी आहे. कंपन्यांकडून प्रत्येक महिन्याला सिलिंडर गॅस दरांचे प्रत्येक महिन्यात समीक्षण होते. या समीक्षेतून आलेल्या निष्कर्षावर घट किंवा वाढ करण्यात येते.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, तेल कंपन्या वारंवार होत असलेले नुकसान टाळण्यासाठी हा नवा उपाय करत आहेत. प्रत्येक महिन्याच्या समीक्षेत दर कपात केल्याने संपूर्ण महिनाभर नुकसान सहन करावे लागत असे. मात्र, आता प्रत्येक आठवड्याला दराबाबत विचार करुन निश्चिती केल्यास कंपनीला फायदा होऊ शकेल, असा विश्वास कंपन्यांकडून व्यक्त केला जात आहे. (हेही वाचा, Paytm च्या माध्यमातून LPG Cylinder बुकिंगवर मिळणार 500 रुपयांचा कॅशबॅक, 'या' पद्धतीने लाभ घ्या)
या महिन्याचा (डिसेंबर) विचार करता दोन वेळा गॅस सिलिंडर दरात बदल झाला आहे. ते दोन वेळा वाढले आहेत. एलपीजी गॅस सिलिंडर वितरकांचे म्हणने असे की, जर प्रत्येक आठवड्यात गॅस सिलिंडर दरात बदल झाला तर तांत्रिक अडचण निर्माण होईल. त्यामुळे वेगळाच गुंता तयार होईल.
IOC संकेतस्थाळावर उपलब्ध असलेल्या माहितीनिुसार डिसेंबर महिन्यातील 2 तारखेला गॅस सिलिंडर सुमारे 50 रुपयांनी महाग झाला आहे. ऑईल मार्केटींग कंपन्यांनी व्यावसायिक गॅस दरात 1 डिसेंबरला वाढ केली होती. त्यामुळे 19 किलो गॅस सिलिंडर दर 55 रुपये इतका झाला होता.