आर्थिक कामांशी संबंधित असणारे आणि महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक असलेले असे तुमचे पॅन कार्ड गहाळ झाले असेल किंवा हरवले असेल तर मुळीच काळजी करु नका. तुम्ही Duplicate PAN Card मिळविण्यासाठी अर्ज करु शकता आणि ते मिळवूही शकता. खास करुन आता Duplicate PAN Card मिळवणे अधिक सोपे झाले आहे. पुर्वी ही प्रक्रिया अधिक किचकट आणि विलंब लावणारी होती. मात्र, आता ऑनलाईनचा जमाना आल्याने ही प्रक्रिया विनाविलंब पार पडते. Duplicate PAN Card Online किंवा Offline पद्धतीने तुम्ही मिळवू शकता. त्यासाठी आपण पुढील प्रमाणे अर्ज करुन पॅन कार्ड मिळवू शकता.
केवळ पॅन कार्डधारक व्यक्तीच डुप्लिकेट पॅन कार्ड मागणीसाठी अर्ज करु शकतो. हा अर्ज NSDL e-government किंवा आयकर विभाच्या ई-पोर्टल माध्यमातून अर्ज करता येऊ शकतो. आयकर विभागाच्या संकेतस्थळावर अप्लाय करण्यासाठी आपणाकडे नोंदणीकृत मोबाईल नंबर असायला हवा. ज्यावर आपल्याला ओटीपी प्राप्त होईल. अप्लाय करण्यासाठी https://www.tin-nsdl.com/ या संकेतस्थळावर अप्लाय करु शकता. पुढे ‘Reprint of PAN Card’ या ऑप्शनवर क्लिक करा. आता आपले विवरणपत्र दिसेल. पुढे एका पर्यायावर क्लिकरता आपल्याला ओटीपी हवा काय असे विचारण्यात येईल. त्यावर क्लिक करा आपल्याला पॅन कार्ड क्लिक करण्याची पुष्टी करण्यासाठी विचारण्यात येईल. त्यावर क्लिक करा. आता तुमचा ओटीपी तयार होईल. परंतू, ध्यानात ठेवा की, हा ओटीपी केवळ 10 मिनिटांसाठीच वैध असेल आणि तो तुमच्या नोंदणीकृत मोबाईल किंवा इमेलवर तुम्हाला प्राप्त होईल.
ओटीपी प्राप्त झाल्यानंतर तो विवित ठिकाणी भरा आणि क्लिक करा. तुमच्या स्किरनवर तुमचे पॅन कार्ड तयार असल्याचा संदेश दिसेल. आता तुम्ही तुमचे पॅन कार्ड डाऊनलोड करु शकता. त्यासंबंधीची पुष्टी करणारा मेसेज तुमच्या नोदणीकृत मोबाईल किंवा ईमेलवर प्राप्त झालेला असेल. (हेही वाचा, Aadhar Update : काय आहे Masked Aadhar? कसे डाउनलोड कराल या नव्या फीचरसह तुमचे आधार कार्ड?)
डुप्लिकेट पॅन कार्डसाठी आपण ऑफलाईनही अर्ज भरु शकता
डुप्लिकेट पॅन कार्डसाठी ऑफलाइन अर्ज भरण्यासाठी आपण टीआयएन सुविधा केंद्र, आयटी पॅन सेवा केंद्रे किंवा पॅन केंद्रांवर जाऊन सेवा घेऊ शकाता. याशिवया तुम्ही आयकर विभागाची अधिकृत वेबसाईट्स www.incometaxindia.gov.in , www.utiitsl.com किंवा www.tin-nsdl.com आदींवरही ऑफलाइन अर्ज भरु शकता. ज्यामुळे तुम्हााल डिप्लिकेट पॅन कार्ड प्राप्त होऊ शकेल.