Fastag KYC: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) फास्टॅग केवायसी (KYC) अनिवार्य केले आहे. त्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024 म्हणजेच आज आहे. त्यामुळे जर तुम्ही अद्याप फास्टॅगचे केवायसी (Fastag KYC) केले नसेल, तर ते लवकरात लवकर पूर्ण करा. ज्यांचे KYC अपडेट केलेले नाही ते फास्टॅग उद्यापासून काम करणार नाहीत. वास्तविक, फसवणूक थांबवण्यासाठी NHAI ने हे पाऊल उचलले आहे. फास्टॅग केवायसी कसे करावे? यासंदर्भात खालील मुद्दयांच्या आधारे जाणून घ्या...(वाचा -FASTag आता बंधनकारक! कुठे मिळणार फास्ट टॅग, आवश्यक कागदपत्रं कोणती?)
फास्टॅग केवायसीची प्रक्रिया ?
- तुम्हाला बँकेशी लिंक असलेल्या फास्टॅग वेबसाइटवर जावे लागेल.
- यानंतर तुम्ही तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर आणि ओटीपी वापरून लॉग इन करा.
- आता My Profile निवडा आणि नंतर KYC वर क्लिक करा.
- यानंतर सर्व आवश्यक माहिती भरा आणि सबमिट करा.
- तुम्हाला केवायसीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे जसे की वाहनाची आरसी, पत्ता
- पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो जोडावा लागेल.
- अशा प्रकारे तुमचे फास्टॅग केवायसी होईल. (वाचा - Paytm FASTag: पेटीएम फास्टॅग निष्क्रिय करायची आणि नवीन घेण्याची पद्धत, जाणून घ्या)
फास्टॅग केवायसी स्टेटस कसे तपासावे?
- तुम्हाला fastag.ihmcl.com वर जावे लागेल.
- आता तुम्हाला होम पेजवर लॉग इन करावे लागेल. तुम्ही मोबाईल नंबर आणि OTP द्वारे लॉग इन करू शकता.
- आता My-Profile वर जा आणि KYC Status विभाग निवडा.
- यानंतर एक नवीन विंडो उघडेल जिथे तुमची KYC स्थिती दर्शविली जाईल.
फास्टॅग केवायसी ऑफलाइन कसे करावे?
आज शेवटची तारीख आहे, त्यामुळे सर्व्हर डाउन असू शकतो, त्यामुळे तुम्ही केवायसी ऑफलाइन देखील करू शकता. ऑफलाइन फास्टॅग केवायसीसाठी, तुम्हाला तुमच्या बँकेच्या शाखेत जावे लागेल. येथे तुम्हाला KYC फॉर्म भरावा लागेल आणि कागदपत्रे जोडून सबमिट करावा लागेल. यानंतर तुमचा फॉर्म पडताळला जाईल आणि तुमचा फास्टॅग अपडेट होईल.
केवायसी साठी लागणारी कागदपत्रे -
- कारची आरसी प्रत
- ओळखपत्र (पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड)
- पत्ता पुरावा
- पासपोर्ट साइज फोटो
तुम्ही या दोन्ही पद्धतीने आपले केवायसी अपडेट करू शकता. आज फास्टॅग केवायसी अपडेटसाठी शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात-लवकर केवायसी अपडेट करा.