सरकारच्या नव्या नियमावलीनुसार आता टोल नाका पार करण्यासाठी तुमच्या वाहनावर फास्ट टॅग लावणं बंधनकारक आहे. फास्टटॅग नसल्यास तुम्हांला आर्थिक दंड चुकवावा लागू शकतो. प्रवास वेगवान करण्याच्या उद्देशाने आता फास्टटॅग बंधनकारक करण्यात आले आहे. फास्टटॅग प्रोग्राम ही radio-frequency identification technology वर चालते. यामुळे टोल प्लाझावर थांबून टोल न देता तो कोड स्कॅन करून थेट अकाऊंट मधून कापला जातो. याकरिता फास्टटॅग सोबत लिंक केलेल्या बॅंक वॉलेट मधून डिजिटली पैसे कापले जाणार आहे. पण मग हा फास्ट टॅग तुमच्या गाडीवर लावायचा कसा? कुठे मिळणार? तो फास्ट टॅग रिचार्ज कसा करायचा? त्याची वैधता काय? या तुमच्या सार्या प्रश्नाची इथे पहा उत्तरं! Fastag: आजपासून टोलनाक्यांवर वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य अन्यथा दुप्पट टोल वसूली होणार.
फास्ट टॅग कुठे मिळणार?
फास्ट टॅग ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात मिळणार आहे. आरटीओ (RTO) कार्यालय, सेवा केंद्र, वाहतूक केंद्र आणि काही निवडक पेट्रोल पंपांवर आणि काही बॅंकांमध्ये फास्ट टॅग उपलब्ध करण्यात आले आहेत. बँका, इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यासारख्या ठिकाणी फास्टॅगच्या विक्रीसाठी विशेष विक्री केंद्र आहेत.
दरम्यान My FASTag App वर तुम्हांला ही केंद्र शोधता येऊ शकतात. कार, जीप्स आणि व्हॅनसाठीचे फास्टॅग हे अॅमेझॉन, पेटीएम, स्टेट बँक, ICICI बँक, अॅक्सिस बँक, HDFC बँक, IDFC फर्स्ट बँक यांच्या वेबसाईटवरून ऑनलाईन देखील विक्री साठी उपलब्ध आहेत. fastag.org/apply-online वेबसाईटही अर्ज करण्याची सोय आहे.
फास्ट टॅग वैधता आणि रिचार्ज कसा करता येणार?
एका फास्टटॅगची वैधता 5 वर्ष आहे. यामध्ये तुमच्या अकाऊंटमधील टोलची रक्कम आपोआप कापली जाणार आहे. (Fastag: जाणून घ्या कसा कराल फास्टॅगचे रिचार्ज).
फास्ट टॅग साठी आवश्यक कागदपत्र
फास्ट टॅग साठी तुम्हांला गाडीचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट म्हणजेच RC बूक, गाडीच्या मालकाचा पासपोर्ट साईझ फोटो आणि ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक आहे. रहिवासी पत्त्याच्या पुरावा म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा व्होटर आयडी देखील आवश्यक आहे.
टोलनाक्यावर मागील काही महिन्यांपासून विशिष्ट लेन या फास्ट टॅग साठी ठेवण्यात आल्या होत्या. आता फास्ट टॅग बंधनकारकच करण्यात आला आहे. त्यामुळे तुमच्याकडे फास्टटॅग नसेल तर टोलच्या दुप्पट दंड तुम्हांला भरावा लागणार आहे. दरम्यान तुमच्या फास्ट टॅग अकाऊंटमध्ये पुरेसा बॅलन्स नसल्यास किंवा तो टॅग डॅमेज असल्यास तुम्हांला फाईन अर्थात दंड भरावा लागणार आहे.