KYC Update: E-KYC झालेल्या ग्राहकांना पडताळणीसाठी बोलवू नका, RBI चे बँकांना निर्देश
Representational Image (Photo Credit: PTI)

ई-केवायसी (E-KYC) किंवा सी-केवायसी (C-KYC) पूर्ण केलेल्या बँक ग्राहकांना बँकेने ओळख पडताळणीसाठी पुन्हा कार्यालयात बोलावू नये, असे निर्देश भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने बँकांना बुधवारी (7 डिसेंबर) दिले आहेत. केवायसी पूर्ण झालेल्या ग्राहकांना कार्यालयात येण्यासाठी बँकांनी दबाव टाकू नये असेही आरबीआयने म्हटले आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले की, जे ग्राहक केवासी पडताळणी ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करतात ते ग्राहक दरवर्षी आपल्या माहितीतील बदल आणि व्यक्तीगत माहितीतील बदलही ऑलनाईन पद्धतीने करु शकतात.

शक्तिकांत दास यांनी पुढे म्हटले की, बँकांना असा ग्राहकांवर तथ्य पडताळणी, ओळख पडताळणी अथवा माहिती अद्ययावत करण्यासाठी कार्यालयात येण्यासाठी दबाव टाकू नये. त्यांनी म्हटले की, असा प्रकारे आपण केवायसी विवरण सी केवायसी पोर्टलवर अपलोड केली असेल तर त्यांनाही बँकेत बोलावले जाऊ नये.

पुढे बोलताना शक्तिकांत दास म्हणाले, आपण नोंदणीकृत ईमेल आयडीवरुन किंवा मोबाईलवरुन बँकेला ईमेल किंवा मेसेज पाठवला जाऊ शकतो की, ते सी-केवायसी पोर्टलच्या माध्यमातून केवायसी विवरण घेऊ शकतात. आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर टी रवि शंकर यांनी म्हटले की, बँकांच्या शाखा पातळीवर या बाबतीत कमी जागृती आहे. त्यांनी म्हटले की, केंद्रीय बँक नियमीतपणे बँकांना सांगते की ग्राहकांना केवायसी पडताळणीसाठी त्रास देऊ नका.