India Post Recruitment 2022: इंडिया पोस्टने एक अधिसूचना जारी केली आहे. ज्यात मेल मोटर्स सर्व्हिस विभागांतर्गत स्टाफ कार ड्रायव्हर पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे 17 पदांसाठी भरती केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी 10 मार्च 2022 पर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना अधिकृत वेबसाइट indiapost.gov.in ला भेट द्यावी लागेल. (Indian Railway Recruitment 2022: भारतीय रेल्वेमध्ये शिकाऊ उमेदवारासाठी सुवर्णसंधी, जाणून घ्या काय आहे पात्रता आणि पगार)
रिक्त जागांची माहिती -
पद: कर्मचारी कार चालक (सामान्य श्रेणी)
पदांची संख्या: 17
पगार: लेव्हल-2 नुसार
विभागवार पदांचा तपशील -
मेल मोटर सेवा कोईम्बतूर: 11
इरोड विभाग : 02
निलगिरी विभाग: 01
सेलम पश्चिम विभाग: 02
तिरुपूर विभाग: 01
वयोमर्यादा -
कमाल वयोमर्यादा: 56 वर्षे
पात्रता -
या पदांसाठी इच्छुक उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि त्याच्याकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्सही असावे. वाहन चालविण्याचा परवाना जड आणि हलक्या अशा दोन्ही वाहनांसाठी असावा. उमेदवाराला तीन वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव असावा.
इंडिया पोस्ट भर्ती 2022 साठी असा करा अर्ज -
इच्छुक आणि पात्र उमेदवारने अधिसूचनेत नमूद केलेल्या नमुन्यात फॉर्म भरावा. तसेच कागदपत्रांच्या स्वयं-साक्षांकित प्रती, वयाचा पुरावा, फोटो, जात प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी फॉर्मसह To the Manager, Mail Motor Service, Goods Shed Roads, Coimbatore, 641001. या पत्त्यावर पाठवा.