IRCTC New Website: आयआरसीटीसी वेबसाईट द्वारा Train Booking सुपरफास्ट; काही मिनिटांत होणार तुमचे काम; आज लॉन्चिंग
Indian Railways (Photo Credits: I File Image)

रेल्वे प्रवासाला निघताना सर्वात महत्त्वाचे आणि तितकेच वेळखावू काम म्हणजे तिकीट बुकींग (Railway Ticket Booking). सर्व्हर डाऊन, ई-तिकीट वेबसाई हँग होणे, स्लो होणे हे तर नित्याचेच. पण आता ते सगळं विसरा IRCTC New Website लॉन्च करत आहे. ज्याद्वारे आपण Indian Railways चे कोणतेही तिकीट अवघ्या काही मिनिटांमध्ये बुक करु शकता. केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल (Railway Minister Piyush Goyal) आज (31 डिसेंबर 2020) ही वेबसाईट लॉन्च करत आहेत. सांगितले जात आहे की, ही नवी वेबसाईट गतीमान असेल. या द्वारे प्रवाशांना रेल्वे तिकीट काही मिनिटांमध्येच बुक करता येणार आहे. तसेच, यात अधिक फअरेंडली फीचर्स असणार आहेत शिवाय विविध बदलही पाहायला मिळणार आहेत.

रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे की, IRCTC वेबसाईट आणि अॅप हे (IRCTC App) अधिक अद्ययावत आहे. त्यामुळे प्रवाशांना या आधीपेक्षा अधिक वेगाने आणि कोणत्याही अडचणीशिवाय रेल्वे तिकीट बुक करता येणार आहे. IRCTC (आयआरसीटीसी) वर दररोज शेकडो लोक तिकीट बुक करतात. यात ई-तिकीट बुकींगचा मोठा समावेश असतो. अशा वेळी अनेकदा सर्वर लोड घेत नाही. त्यामुळे साईट स्लो होणं, हँग होणं अशा गोष्टी घडतात. त्यामुळे प्रवाशांचा वेळ तर जातोच. परंतू, अनेकदा त्यांना निश्चित वेळेत प्रवासही करता येत नाही. बुकींगमध्ये चुकाही होतात. त्यामुळे भारतीय रेल्वे आता नवी वेबसाईट लॉन्च करत आहे. (हेही वाचा, Indian Railway Mega Bharti: भारतीय रेल्वे मध्ये 1.4 लाख जागांसाठी मेगा भरती, परीक्षांसाठी रेल्वेकडून विशेष तयारी)

भारतीय रेल (Indian Railways) IRCTC ई-तिकटिंग वेबसाइट आणि अॅप अशा दोन्हीचे अद्ययावतीकरण करत आहे. रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे की, वेबसाईट आणि अॅप असे दोन्ही अपग्रेड केल्यानंतरत प्रवाशांना आधीच्या तुलनेत अधिक चांगला अनुभव येईल. प्रवासी आपले तिकीट पहिल्यापेक्षा अधिक वेगाने आणि अडथळ्यांशिवाय बुक करु शकतील.