Indian Railway Mega Bharti: भारतीय रेल्वे मध्ये 1.4 लाख जागांसाठी मेगा भरती, परीक्षांसाठी रेल्वेकडून विशेष तयारी
Indian Railway (Photo Credits: File Photo)

कोरोना व्हायरस (Coronavirus) आणि लॉकडाऊनचा (Lockdown) फटका अनेक कंपन्यांना बसला. या काळात अनेक कंपन्या बंद झाल्या आणि ज्यामुळे अनेकजण बेरोजगार झाले. अशा परिस्थितीत भारतीय रेल्वे (Indian Railway) यांच्यासाठी आशेचा किरण बनून आली आहे. भारतीय रेल्वे मध्ये 1.4 लाख जागांसाठी भरती (Indian Railway Mega Bharti) निघाली आहे. ज्यात जवळपास 2.44 कोटी होतकरू तरुणांचा समावेश आहे. कोविड-19 महामारीच्या दरम्यान इतकी मोठी भरती निघाली असून त्याच्या परीक्षेसाठी सरकारने मोठी तयारी केली आहे. या पदासाठी प्रवेश परीक्षा सुरु झाल्या असून त्यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे.

देशभरातून या रेल्वे भरतीसाठी उमेदवारांनी नोंदणी केली असून सुनिश्चित परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी उमेदवारांसाठी रेल्वेकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. यात मास्क, सॅनिटायजर, सोशल डिस्टंसिंग या सर्वांचे पालन होत आहे की नाही याची काळजी घेतली जाणार आहे. तसेच परीक्षा केंद्रावर आलेल्या प्रत्येक उमेदवारांची तपासणी केली जाईल. कोटींच्या वर या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेणे हे भारतीय रेल्वेसोमोर मोठे आव्हान असणार आहे.हेदेखील वाचा- BARC Recruitment 2020: भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटरमध्ये स्टायपेंड ट्रेनी पदासाठी नोकर भरती, 31 जानेवारी पर्यंत करता येणार अर्ज

परीक्षेदरम्यान कोणतीही अडचण येऊ नये यासाठी परीक्षा केंद्रावर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांसह येणा-या पालकांच्या संख्येवर देखील मर्यादा आणण्यात आली आहे. तसेच मास्क लावणे, सॅनिटायजरचा उपयोग करणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे या गोष्टी बंधनकारक असणार आहेत.

वेगवेगळ्या राज्यांतून परीक्षेसाठी येणा-या उमेदवारांसाठी विशेष रेल्वे सुरु सोडण्यात आल्या आहेत. तसेच त्या रेल्वेमध्ये सॅनिटायजिंग आणि अन्य सुविधा बरोबर आहेत की नाही याची काळजी घेतली जाणार आहे.